संचारबंदी असतानाही पंढरपूर विठ्ठल मंदिरात महाद्वार काला; नामदेव महाराजांच्या वंशजासह २० जणांवर गुन्हा दाखल

पंढरपूर प्रतिनिधी । देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत . अश्यातच महाराष्ट्रातील अनेक जिल्हयांनी  कोरोना संकटावर मात करण्यासाठी संपूर्ण जिल्हा  लॉक डाउनची पद्धत राबवली आहे. त्यामध्ये सातारा ,पुणे या जिल्ह्यांचा समावेश  आहे. तसेच कोणतेही कार्यक्रम करताना सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करतच सर्व  बाबी करायच्या आहेत. असा आदेश  जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळाला आहे. या सर्व आदेशांचे पालन न करत  विठ्ठल मंदिरात महाकाला आयोजित केला होता. त्यामुळे सगळीकडे खळबळ माजली आहे. यापूर्वी  दिल्ली मध्ये मरकज  चा कार्यक्रम झाला होता. त्याचे  पडसाद सर्व देशभर उमटले होते.

  देशभरातील सर्व  जातींची धार्मिक स्थळे , तसेच पार्थना स्थळे यांच्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. परंतु ,पंढरपूर येथे  शासनाच्या सर्व सूचनांना  छेद देत  विठ्ठल मंदिरात  महाद्वार काला  या कार्यक्रमाचे आयोजन  केले गेले होते.   राज्यभरात   संचारबंदी असताना ही विठ्ठल मंदिरात  असा कार्यक्रम केल्यानंतर पंढरपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पंढरपूर शहरात  गोंधळाचे   वातावरण तयार झाले  आहे. यामध्ये  नामदेव महाराजांच्या वंशजांसह २० जणावर  पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला  आहे.

  पंढरपूर मंदिरामध्ये    महाद्वार काला करताना  जमावबंदीचा आदेश मोडून गर्दी जमा केल्या प्रकरणी  गुन्हा दाखल केला आहे.  तब्बल १० दिवसानंतर संत नामदेव महाराजांच्या वंशजांसह २० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पंढरपूर मध्ये महाद्वार काला संपन्न झाला त्या कार्यक्रमात   ह.भ.प मदनमहाराज हरीदास यांचाही या कार्यक्रमात समावेश होता. कार्यक्रमाच्या दरम्यान ह.भ.प मदनमहाराज हरीदास यांनी पांडुरंगाच्या पादुका डोक्यावर घेतल्या होत्या.  महाद्वार काला या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे ह.भ.प मदनमहाराज हरीदास यांच्यासह २०जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.