हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vivo Y100 : आजकाल बाजारात अनेक नवनवीन स्मार्टफोन दाखल होत आहेत. अशातच आता Vivo या मोबाईल बनवणाऱ्या कंपनीने आपल्या Y-Series मधील नवीन फोन Vivo Y100 लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची खास बाब अशी कि याच्या मागील बाजूस कलर चेंजिंग पॅनल देण्यात आला आहे.
या नवीन स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 900 प्रोसेसर देण्यात आला आहे. Vivo Y100 च्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच हा फोन ट्वायलाइट गोल्ड आणि पॅसिफिक ब्लू या कलर-चेंजिंग वेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. यासोबतच ग्राहकांना मेटल ब्लॅक कलरचा पर्याय देखील मिळेल. हा नवीन स्मार्टफोन आजपासून Flipkart, Amazon, Vivo India e-store आणि पार्टनर रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येईल.
Vivo Y100 5G च्या फीचर्स बाबत बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन Android 13 बेस्ड FunTouch OS 13 वर काम करेल. यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेटसहीत 6.38-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले HDR10+ सर्टिफाईड आहे आणि त्याची जास्तीत जास्त ब्राइटनेस 1300 nits पर्यंत आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 5G, ड्युअल-बँड वायफाय, ब्लूटूथ 5.2, ड्युअल सिम कार्ड, यूएसबी टाइप-सी, 3.5mm ऑडिओ जॅक, जीपीएस आणि ओटीजी सपोर्ट देण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये 6nm प्रोसेस बेस्ड ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 900 प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच 4,500mAh ची बॅटरी देखील देण्यात आली आहे जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास फोटोग्राफीसाठी याच्या मागील बाजूस 64MP चा प्रायमरी कॅमेरा आणि ड्युअल 2MP सेंसर देण्यात आले आहेत. तसेच यामध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी याच्या समोरील बाजूस 16MP कॅमेरा दिला गेला आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.cashify.in/vivo-y100-price-in-india
हे पण वाचा :
बनवायची आहे आपल्या नावाची Ringtone, फॉलो करा ‘या’ स्टेप्स
मोबाईलचे Charger फक्त दोनच रंगांचेच का असतात ??? जाणून घ्या यामागील कारणे
SBI Card कडून क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यावरील प्रक्रिया शुल्कात वाढ, तपासा इतर बँकांचे चार्ज
Stock Market : येत्या काळात ‘या’ सेक्टर्समधील शेअर्स देऊ शकतील जबरदस्त रिटर्न
Gold Price Today : सोन्या-चांदी झाले स्वस्त, पहा आजचे नवीन दर