नाकात ऑक्सिजनची नळी अन् थकलेला चेहरा; तरीही गिरीश बापट भाजपसाठी मैदानात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य आहे. या दोन्ही जागांसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळत असून प्रचाराला सुरुवात झाली आहे. या दोन्ही जागांवर भाजपचे आमदार होते त्यामुळे आपला गड राखण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाजपचे खासदार गिरीश बापट आजारपणातही मैदानात उतरले आहे. यावेळी त्यांच्या नाकात ऑक्सिजनची नळी असूनही ते भाजपच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत.

कसबा मतदार संघासाठी भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आज त्यांच्या यांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांनी हजेरी लावली. यावेळी बापट हे पूर्णपणे थकल्यासारखे वाटत होते. त्यांच्या नाकात ऑक्सिजनची नळी असल्याने त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. तसेच हातालाही ऑक्सिमीटर लावण्यात आला होता. अशा अवस्थेतही ते भाजपाच्या प्रचारासाठी आले होते. गिरीश बापट हे पुणे शहराचे विद्यमान खासदार असून कसबा मतदार संघ आणि पुणे शहरावर त्यांची मजबूत पकड आहे.

दरम्यान, यावेळी गिरीश बापट यांनी भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. कार्यकर्त्यांनी चांगलं काम करा, कार्यकर्ता पक्षाचा आत्मा आहे असं त्यांनी म्हंटल. हेमंत चांगलं काम करत असून तो नक्की जिंकून येणार आहे. थोडी ताकद लावा मी बरा होऊन परत येईल, हेमंत सारणे विजयी झाल्यावर पेढे भरवायला मीच येईल, असंही बापट म्हणाले .