सोलापूर प्रतिनिधी । संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत ३३.१२ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली. ११ विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी सकाळी सात वाजता प्रारंभ झाला़ संततधार पावसामूळ सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी कमी प्रमाणात होती़. मात्र अकरा वाजण्याच्या सुमारास पाऊस थांबला अन मतदारांनी मतदान केंद्रावर मोठी गर्दी केली होती. दुपारपर्यंत ३३.१२ टक्के मतदान झाल. दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढेल असा विश्वास जिल्हा निवडणुक कार्यालयानं व्यक्त केला.
अधिकाधिक मतदान व्हावं, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. तरीही आज पावसाचा जोर कायम राहिला तर मतदारांना घराबाहेर कसं काढायचं असं आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. तिकडे मतदान सुरळीत पार पडावं यासाठी निवडणूक आयोग, पोलीस कर्मचारी सज्ज आहेत.