Tuesday, June 6, 2023

नांदेडमध्ये मतदानाला पावसाचा फटका, मतदान केंद्रावर गर्दीच नाही

नांदेड प्रतिनिधी । नांदेडमध्ये आज सकाळपासून पाऊस पडतो आहे. रिमझिम पावसात मतदान प्रक्रिया सुरु आहे. मात्र मतदान केंद्रावर मतदारांची म्हणावी अशी गर्दी दिसत नाही. सकाळच्या पहिल्या सत्रात पावसामुळ मतदारांचा अल्प प्रतिसाद आहे. त्यामुळं पावसाचा मतदानावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. एखाद दोन मतदार येऊन मतदान करताना दिसतायेत. जिल्हातील एकूण ९ मतदार संघात २९५५ मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे. इथं एकूण ३२७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्या भवितव्याचा फैसला आज मतदान यंत्रात बंद होणार आहे.

जिल्ह्यात मध्यरात्रीपासून जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. रविवारी देखील जिल्ह्यात जाेरदार पाऊस सुरु झाला. जिल्ह्यातील कंधार तालुक्यात पेठवडज, कुरुळा, बारूळ, नांदेड शहरातील वाजेगाव, लिमगाव, मुदखेड परिसरात जोरदार पाऊस कुंडलवाडी, रामतीर्थ, देगलूर, धर्माबाद तालुक्यामध्ये काही ठिकाणी तुरळक पाऊस तर काही भागात रात्रीपासून जोरदार पाऊस पडतोय. या पावसामुळ सोयाबीन व अन्य खरीप हंगाम हातातून गेल्यान शेतकरी चिंतातूर झालाय. आणि या पावसाचा थेट परिणाम आजच्या मतदानावर आजच्या विधानसभेच्या मतदानावर होण्याची दाट शक्यता आहे.