Wai Ganpati Mandir : ‘सिंघम 3’च्या शूटिंगसाठी वाईच्या गणपती मंदिराला विद्युत रोषणाईची झळाळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Wai Ganpati Mandir) बॉलिवूडचा प्रसिद्ध सिने दिग्दर्शक रोहित शेट्टी कायम त्याच्या ऍक्शन सिनेमा तसेच सिरीजमुळे चर्चेत असतो. रोहित शेट्टीची सिंघम सिरीज तर ठरली. या सिरींजचा पुढील भाग अर्थात ‘सिंघम ३’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या या सिनेमाचे शूटिंग सुरु आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून साताऱ्यातील वाई तालुक्यात या सिनेमाचे शूटिंग सुरु आहे. दरम्यान वाईतील गणपती मंदिराच्या आवारात देखील या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले.

निसर्गरम्य वाई

रोहित शेट्टीच्या आगामी ‘सिंघम ३’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी वाईच्या प्रसिद्ध गणपती मंदिर परिसरात सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ज्यामुळे गणपती घाट अगदी उजळून निघाला होता. (Wai Ganpati Mandir) यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची नजर आपसूकच मंदिराकडे जात होती. सुंदर हिरवागार निसर्ग, डोंगररांगा, गडकिल्ले यांसाठी वाई शहर आणि तालुका आधीपासूनच प्रसिद्ध आहे. त्यामुळे या ठिकाणी आजपर्यंत अनेक मालिका, मराठी चित्रपट, हिंदी सिनेमा, भोजपुरी सिनेमा, सीरिजचे शूटिंग करण्यात आले आहे.

यानंतर आता रोहित शेट्टीच्या अत्यंत लोकप्रिय सिरीजमधील चित्रपटाचे शुटिंगदेखील वाईतील काही ठराविक ठिकाणी होत आहे. माहितीनुसार, या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, अर्जुन कपूर आदींच्या मुख्य भूमिका आहेत. (Wai Ganpati Mandir) आतापर्यंत शूटिंगसाठी राम तेरी गंगा मैली, सरगम, चेन्नई एक्स्प्रेस, दबंग, सिंघम, इश्किया, ओंकारा, स्वदेश, गंगाजल यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांसाठी वाईच्या गणेश मंदिराचे लोकेशन वापरले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या परिसराला शूटिंगसाठी प्राधान्य दिले आहे, यात काही वेगळे वाटण्याची गरज नाही.

आकर्षक रोषणाईने चमकला परिसर (Wai Ganpati Mandir)

यापूर्वी रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’ या चित्रपटाचे शूटिंग वाईमधील धोम धरण परिसरात करण्यात आले आहे. यानंतर आता ‘सिंघम ३’च्या निमित्ताने पुन्हा एकदा रोहित शेट्टीने वाईतील लोकेशन्सला शूटिंगसाठी प्राधान्य दिले आहे. मंदिराच्या परिसरात शूटिंगसाठी केलेली रोषणाई इतकी सुंदर आहे की पाहताच कुणालाही वाटेल मंदिरात उत्सव आहे. मात्र, सध्या गणपती घाटावर कोणताही उत्सव सुरु नाही. परंतु, या चित्रीकरणामुळे खूप मोठी आर्थिक उलाढाल सुरु आहे. दरम्यान जवळील हॉटेल व्यावसायिक, गावकरी आणि स्थानिक कलाकारांना रोजगार उपलब्ध होत आहे. (Wai Ganpati Mandir)