सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यासह देशात गाजलेल्या तथाकथित डॉ. संतोष पोळ याने केलेल्या वाई हत्याकांड प्रकरणातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिला सातारा जिल्हा न्यायालयाने 1 वर्षासाठी जामीन मंजूर केलाय. वैद्यकीय उपचारासाठी ती तब्बल सहा वर्षांनंतर मोठ्या कालावधीसाठी बाहेर येणार आहे.
डॉ. संतोष पोळ या सीरियल किलरने 6 जणांचे खून करून ते मृतदेह त्याच्या फार्म हाऊसमध्ये पुरले होते. यातील एका खुनात ज्योती मांढरे हिचा सहभाग आढळला होता. सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने 2016 साली हे हत्याकांड उजेडात आणल्यानंर वाईसह सातारा जिल्हा हादरून गेला होता.
वाई हत्याकांडाची सुनावणी सातारा जिल्हा न्यायालयात सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून डॉ. संतोष पोळ याच्या लहरीपणामुळे या खटल्याची सुनावणी संथ गतीने सुरू आहे. अशातच ज्योती मांढरे हिच्या वतीने न्यायालयात तिला वैद्यकीय उपचारासाठी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला असता न्यायालयाने त्याला अटी,शर्तीवर मंजुरी दिली आहे.