हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| प्रत्येक सणसमारंभाला आपण सुंदर आणि आकर्षित दिसावे असे सर्व महिलांना वाटत असते. यात दिवाळी सण असेल तर मग महिला वर्ग तयार वर्ग होण्यासाठी जास्त मेहनत घेतो. यंदाच्या या दिवाळीत तुम्ही देखील सुंदर आणि आकर्षित दिसण्यासाठी मेहनत घेणार असाल तर आताच थांबा. कारण, आज आम्ही तुम्हाला अशा काही टीप्स देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी कोणतीही अधिकची मेहनत घ्यावी लागणार नाही. तुम्ही पुढे दिलेल्या या खास टिप्स फॉलो केल्या तर सर्वांचीच नजर तुमच्यावर खिळून राहील.
1) महाराष्ट्रीयन लुक करा
दिवाळी सण आजवर चालत आलेली संस्कृती आणि परंपरा जपतो. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत तुम्हाला सुंदर आणि आकर्षित दिसायचे असेल तर तुम्ही महाराष्ट्रीयन लुक करा. तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असाल तरी हरकत नाही. परंतु सर्वांमध्ये आकर्षित दिसण्यासाठी तुम्ही हा लुक नक्की ट्राय करून बघा. महाराष्ट्रीयन लुक करण्यासाठी नऊवारी साडी नेसा, पारंपारिक दागिने घाला, अंबाडा बांधा आणि नाकात नथ घाला. यामुळे तुम्ही सर्वात जास्त खुलून दिसाल.
2) दिवाळीसाठी थीम ठरवा
दिवाळी सणामध्ये सर्वजणच नवीन कपडे घालतात. परंतु यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्ही जर एखादी थीम ठरवून नव्या स्टाईलचे कपडे परिधान केले तर सर्वांचीच नजर तुमच्यावर पडेल. या नव्या लुकमुळे तुम्ही सुंदर देखील दिसाल. थोडक्यात, दिवाळीच्या प्रत्येक वेगवेगळ्या दिवशी तुम्ही नविन असा लूक करा. या नव्या लूकवर तुम्ही फोटोशूट देखील करू शकता. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत असा काहीतरी प्रयत्न करण्याचा विचार नक्की करा.
3) सिंपल साधे रहा
या दिवाळीमध्ये तुम्हाला जर सुंदर दिसायचे असेल तर सर्वात प्रथम आपण सिम्पल आणि ब्युटीफुल दिसू याकडे लक्ष द्या. कारण की, दिवाळी म्हटलं की बडबडीत मेकअप करणे हा विचार पहिला आपल्या डोक्यात येतो. परंतु असा मेकअप सर्वजण करतात. त्यामुळे याच्या उलट जाऊन तुम्ही खूप साधा लाईट मेकअप करा. तसेच तुम्ही अनारकली वा साडी परिधान केली असेल तर केसात गजरा माळा, हातात मॅचिंग रंगाच्या बांगड्या घाला. कानात झुमके घाला. फक्त एवढ्या गोष्टी केल्या तरी तुम्ही सर्वात सुंदर दिसाल.