हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | PF Account : EPFO कडून आपल्या सब्सक्रायबर्सना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत. EPFO च्या जवळपास सर्वच सेवा डिजिटल केल्या गेल्या आहेत. आता ग्राहकांना ऑनलाइन ई-नॉमिनेशनबरोबरच घरबसल्या ऑनलाइन नवीन UAN नंबर देखील तयार करता येईल. त्याचप्रमाणे, EPF अकाउंट बॅलन्स तपासणे आणि e-KYC देखील ऑनलाइन अपडेट करता येईल.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हे कर्मचारी, नियोक्ता आणि काही प्रकरणांमध्ये सरकारच्या योगदानासह तयार केलेले दीर्घकालीन गुंतवणूकीचे साधन आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, PF हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे चालवला जाणारा सामाजिक सुरक्षा कार्यक्रम आहे.हे जाणून घ्या कि, निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षिततेचे साधन म्हणून कर्मचाऱ्यांकडून PF वापरला जातो. PF Account मध्ये वर्षानुवर्षे जमा केलेली रक्कम विशिष्ट व्याजासहीत कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर दिली जाते.
PF Account मधून खाली दिलेल्या अटींद्वारे काढता येतील पैसे –
>> निवृत्तीच्या वेळी (वयाच्या 58 व्या वर्षी किंवा नंतर)
>> 2 महिने बेरोजगार असल्यास.
>> निवृत्तीच्या वयाच्या आधीच कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास नॉमिनी व्यक्तीद्वारे
मात्र, कोरोना साथीच्या काळात, EPFO कडून लोकांसाठी पैसे काढण्याच्या नियमात सुधारणा केली गेली. या नवीन नियमांतर्गत, पीएफ खातेधारकांना त्यांच्या बेसिक सॅलरीच्या आणि महागाई भत्त्याच्या तीन महिन्यांच्या किंवा त्यांच्या PF Account तील निव्वळ शिल्लकच्या 75 टक्के (यापैकी जे कमी असेल तेवढे) पैसे काढता येतील. त्याच प्रमाणे लॉकडाऊन किंवा कर्मचारी कपातीमुळे बेरोजगारीचा सामना करणार्या व्यक्तीला PF खात्यातील निधी काढण्याची परवानगी देण्यासाठी महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला.
PF काढण्याची प्रक्रिया जाणून घ्या –
>> EPFO च्या सदस्याला http://unifiedportal-mem.epfindia.gov.in वर लॉग इन करावे लागेल.
>> Services टॅब अंतर्गत For Employees साठी पर्याय निवडा.
>> नवीन वेबपेजवरील Member UAN/Online Service (OCS/OTCP) पर्यायावर क्लिक करा.
>> UAN, पासवर्ड आणि कॅप्चा कोड वापरून पोर्टलवर लॉगिन करा.
>> Manage टॅब अंतर्गत KYC पर्याय निवडा.
>> नवीन वेबपेजवर जाल. पेजच्या तळाशी Digitally Approved KYC विभाग शोधा आणि आपले KYC Details तपासा. तपशील बरोबर असल्याची खात्री करा.
>> पैसे काढणे पूर्ण करण्यासाठी, टॉप मेनूवर जा आणि Online Service निवडा.
>> ड्रॉपडाउन मेन्यूमधून CLAIM (FORM-31, 19 & 10C) पर्यायावर क्लिक करा. PF Account
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.epfindia.gov.in/
हे पण वाचा :
गेल्या 2 वर्षांत ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांच्या पैशांत केली 6 पट वाढ
देशातील ‘या’ बँका Fixed Deposits वर देत आहेत जबरदस्त रिटर्न, व्याजदर तपासा
Surya Nutan Solar Stove : महागड्या गॅसपासून मिळवा सुटका, घरी आणा सौरऊर्जेवर चालणारा ‘हा’ स्टोव्ह
Bank of Baroda च्या ग्राहकांना मोठा धक्का !!! आता कर्ज घेण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे
Online Banking : चुकीच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केलेले पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या