कराड नगरपरिषदेची वाॅर्ड रचना जाहीर : 31 जागांसाठी होणार निवडणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

ओबीसी आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात फेटाळाला गेल्यानंतर व रद्द करण्यात आल्यानंतर संपूर्ण राज्यात येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात एकच चर्चा सुरू झाली. त्यानंतर ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधीमंडळात एकमतानं मंजूर करण्यात आल्याने प्रभागरचना, निवडणुकीच्या तारखा ठरवण्याचे अधिकार सरकारकडे देण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका सहाजिकच सहा महिने लांबणीवर पडल्या. अशातच होऊ घातलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीबाबत वार्ड रचनेचे नकाशे अनेक ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. कराडात ही सायंकाळी वार्ड रचनेचा नकाशा प्रकाशीत करण्यात आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने याची शहरात चर्चा सुरू झाली आहे.

कराड नगर परिषदेच्या येणाऱ्या निवडणुकीत 31 जागा निवडून द्यावयाचे आहेत. गत निवडणुकी पेक्षा दोन जागा यावेळी वाढल्या असून 2011 च्या लोकसंख्येनुसार ही निवडणूक होणार आहे. त्यानुसार कराड शहरात सुमारे 75 हजार लोकसंख्येनुसार वार्ड रचना व सदस्य संख्या निवडणुकीत दिसणार आहे. त्यानुसार 1 ते 15 वार्ड मधली लोकसंख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये एस सी साठीचे नऊ हजारांहून अधिक मतदार असून एसटीसाठीचे केवळ पाचशे मतदार आहेत. शहरातील वार्ड नंबर 15 ( 8 हजार) सोडला तर इतर चौदा वार्डात सर्वसाधारण साडेचार ते पाच हजार मतदारांचा वार्ड असणार आहे.

कराड शहरात एकूण 31 जागांसाठी 15 वार्ड असणार आहेत यासाठी 2011 च्या लोकसंख्येनुसार ही निवडणूक होणार आहे. 74 हजार 355 एकूण लोकसंख्या असून एससी मध्ये 9 हजार 213 तर एसटीचे 470 अशा लोकसंख्येनूसार वार्ड असतील.

कराड शहरात वाॅर्ड आणि लोकसंख्या पुढीलप्रमाणे

वार्ड क्रमांक 1 मध्ये 4538, (एस सी-249 व एस टी 49 ),

वार्ड क्रमांक 2-4379 (sc 658, st37),

वार्ड क्रमांक 3- 4648 (sc675, st-44),

वार्ड क्रमांक-4-4741 (sc-817, st-27),

वार्ड क्रमांक 5-4460 (sc-1044, st-10),

वार्ड क्रमांक 6-5150 (sc-312,st-29),

वार्ड क्रमांक 7-4894 (sc-100,st-4),

वार्ड क्रमांक 8-4684 (sc-51, st-5),

वार्ड क्रमांक 9-4635 (sc28, st-0,),

वार्ड क्रमांक 10-5092 (sc-248, st-0),

वार्ड क्रमांक 11-4680 (sc2340, st-4),

वार्ड क्रमांक 12-5168 (sc539, st-29),

वॉर्ड क्रमांक 13-4459 (sc-163,st-72),

वार्ड क्रमांक 14-4824 (sc-492,st-27),

वार्ड क्रमांक 15-8003 (sc-1497, st-144)

Leave a Comment