फलटण नगरपालिकेची वाॅर्ड रचना जाहीर : 12 वाॅर्डात 25 जागेसाठी निवडणूक होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | फलटण नगरपरिषदेच्या होवू घातलेल्या निवडणूकीच्या अनुषंगाने सर्वांना उत्कंठा लागून राहिलेली शहराची नवीन प्रारुप प्रभाग रचना जिल्हाधिकार्‍यांच्या स्वाक्षरीने आज दि.10 रोजी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली.

प्रभाग रचनेच्या नवीन प्रारुपानुसार शहराची 13 प्रभागांमधून विभागणी करण्यात आली असून जुन्या प्रभागरचनेत बहुतांश प्रमाणात बदल झाल्याचे दिसून येत आहे.

फलटण शहराची नवीन प्रारुप प्रभाग रचना पुढीलप्रमाणे –

प्रभाग क्रमांक 1 (अ, ब) – श्रीराम सहकारी साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुजारी कॉलनी, नगर परिषद वॉटर वर्क्स, श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय, फिरंगाइॅ मंदिर.

प्रभाग क्रमांक 2 (अ, ब) – बुद्धविहार, रानडे पेट्रोल पंप, बँक ऑफ बडोदा, मटण मार्केट, पेठ मंगळवार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह.

प्रभाग क्रमांक 3 (अ, ब) – कुरेशी मस्जिद, जैनमंदिर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे समाज मंदिर, लक्ष्मीमाता मंदिर, स्मशान भूमी.

प्रभाग क्रमांक 4 (अ, ब) – हरिबुवा मंदिर, महादेव मंदिर, गणेश नगर, फलटण इंडस्ट्रीज जुनी इमारत, निमकर सिड्स, बॅरीस्टर राजाभाऊ भोसले बंगला, महाराजा हॉटेल, बोरावके शोरुम.

प्रभाग क्रमांक 5 (अ, ब) – श्रीकृष्ण बेकरी, संतोषी माता मंदिर, काळुबाई मंदिर, गणपती मंदिर.

प्रभाग क्रमांक 6 (अ, ब) – बुधवार पेठ, लाटकर तट्टी, ईदगाह तळे, दफन भुमी, खंडोबा मंदिर.

प्रभाग क्रमांक 7 (अ, ब) – पाचबत्ती चौक, बादशाही मस्जिद, फलटण गेस्ट हाऊस, हत्तीखाना, टाळकुटे मंदिर, श्रीराम पोलीस चौकी, कुंभार टेक.

प्रभाक क्रमांक 8 (अ, ब) – फलटण नगरपरिषद इमारत, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, एस.टी.स्टँड, श्रीराम हायस्कूल, व्होरा बेबी केअर सेंटर, स्पंदन हॉस्पिटल.

प्रभाक क्रमांक 9 (अ, ब) – फलटण लार्सफ लाईन हॉस्पिटल, कॅनरा बँक, नारळी बाग, संत ज्ञानेश्‍वर मंदिर, विश्राम गृह, माळजाई मंदिर, मुधोजी हायस्कूल.

प्रभाग क्रमांक 10 (अ, ब) – दगडी पूल, हनुमान मंदिर, श्रक्षराम मंदिर, जैन मंदिर, नवलबाई कार्यालय, महादेव मंदिर, स्वामी समर्थ मंदिर.

प्रभाग क्रमांक 11 (अ, ब) – रंगशिळा मंदिर, आबाासहेब मंदिर, ग्रामीण पोलीस स्टेशन, मुधोजी कॉलेज, हरीनारायण टेकडी मंदिर, बाहुबली जिनींग फॅक्टरी.

प्रभाग क्रमांक 12 (अ, ब) – तहसिल व प्रांत कार्यालय, सत्र न्यायालय, पद्मावती नगर, श्रीखंडे मळा, भडकमकर नगर, पोलीस स्टेशन, मध्यवर्ती इमारत.

प्रभाग क्रमांक 13 (अ, ब, क) – गोळीबार मैदान, विद्यानगर, संजीवराजे नगर, हाडको कॉलनी, लक्ष्मी विलास व्हिला.

दरम्यान, प्रारुप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर हरकती दिनांक 17 मार्च 2022 पर्यंत मुख्याधिकारी, फलटण नगरपरिषद यांचे कार्यालयात लेखी सादर करण्याचे सूचित करण्यात आले

Leave a Comment