सावधान : यवतेश्वर घाटात फिरतोय बिबट्या, कॅमेऱ्यात हालचाली कैद

0
44
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

यवतेश्वर रस्त्यावरून रात्री फिरणार यांना सावधान यवतेश्वर घाटात रात्री बिबट्याचे दर्शन झाले आहे. स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गाडीचा प्रकाशाचा उजेड दाखवताच बिबट्या तिथून निघून गेला. तेव्हा वनविभागने लोकांनी यवतेश्वर घाटातून प्रवास करताना व रस्त्यावरून रात्री फिरणाताना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

सातारा शहराजवळ असणाऱ्या यवतेश्वर घाटात शुक्रवारी रात्री बिबट्याचे दर्शन झाले. घाटात रात्री चारचाकी गाडीतून प्रवास करणाऱ्या एका नागरिकांने आपल्या मोबाईलमध्ये या बिबट्याचा व्हिडिअो शूट केला आहे. या घाटातून कास पठारला अनेकजण पर्यटनासाठी जात असतात. तसेच सातारा शहरवासीय व्यायामासाठी या घाटात येत असतात. तेव्हा नागरिकांनी तसेच वाहन चालकांनी सावधानता बाळगण्याचे गरजेचे आहे.

सातारा शहरालगत अनेक डोंगरदऱ्यांचा परिसर आहे. पर्यटनासाठी अनेक पर्यटक व स्थानिक रहिवाशी या घाटातून ये- जा करत असतात. तेव्हा बिनधास्तपणे वावरणाऱ्या लोकांच्यासाठी हा धोक्याचा इशारा आहे. या घाटात व्यायाम तसेच फिरण्यासाठी येणाऱ्यांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. कारण बिबट्या या परिसरात असल्याने वनविभागाच्या मार्गदर्शक सूचना पाळणे गरजेचे आहे. अन्यथा जिवावरही बेतू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here