परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
परभणी व हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणुक निकाल आज घोषीत झाला. दोन्ही जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणूकीत काँग्रेसचे आ. सुरेश वरपुडकर यांच्या पॅनेलने 21 पैकी 12 जागेवर संचालक निवडून आणत निवडणुकीत बाजी मारली आहे.
परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक निकालाची घोषणा झाली असून, अटीतटीच्या या निवडणुकीमध्ये, काँग्रेसचे विद्यमान आमदार, सुरेश वरपुडकर यांच्या गटाने बाजी मारली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण 21 जागांसाठी या निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी 7 जागा या अगोदरच बिनविरोध निवडून आल्या होत्या. आज 14 जागांच्या निकाल जाहीर झाले. या पैकी 8 जागेवर आ.सुरेश वरपूडकर गटाने बाजी मारली. आता बिनविरोध निवडूण आलेल्या 3 सदस्यासह पालम मतदार संघातून निवडणून आलेले गणेश रोकडे यांच्यासह आ .वरपूडकर गटाचे 12 असे संख्याबळ झाले आहे. तर भाजप नेते, माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाला नऊ जागांवर समाधान मानावे लागले.
निवडणूक निकालांमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. यावेळी त्यांनी सोनपेठ मतदारसंघातून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे बंधू गंगाधर बोर्डीकर यांचा एका मताने पराभव केला. मतदानाच्या दिवशी सोनपेठ मध्ये या दोन उमेदवारांमध्ये विवाद झाला होता हे विशेष तर ओबीसी प्रवर्गातून असलेल्या जागेसाठी वरपुडकर गटाचे स्वराजसिंह परिहार व बोर्डीकर गटाचे दत्तराव मांयदळे यांना समान मते पडल्याने चिट्टी पद्धतीने सोडत केल्यानंतर दत्तराव मांयदळे यांचा विजय घोषित झाला.
परभणी जि.म बँ निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या आ. वरपुडकर गटाचे सदस्य पुढीलप्रमाणे …
1- आ वरपुडकर सुरेश अंबादासराव
2-विटेकर राजेश उत्तमराव
3-पाटिल राजेश साहेबराव
4-आ . नवघरे (राजू) चंद्रकांत रमाकांत
5-देशमुख सुरेश सखारामजी
6-वरपुडकर प्रेरणाताई समशेर
7-सरोदे अतुल गोपीनाथ
8-वाघमारे भगवान नारायणराव
बिनविरोध आलेले उमेदवार
9-चोखट पंडितराव
10-देसाई बालाजी
11-पाटील साहेबराव
पाठिंबा उमेदवार
12-गणेश रोकडे