मुंबई : हॅलो महाराष्ट्र – उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कॅबिनेट मंत्र्यासमोरच भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी तुफान राडा केला आहे. लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मंत्र्यांसमोरच आमदार आणि भाजपचे (BJP) कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये ही घटना घडली आहे.
भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यासमोरच भिडले आमदार आणि कार्यकर्ते pic.twitter.com/y1Lm48kruj
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 10, 2022
काय घडले नेमके ?
मुराबादच्या सर्किट हाऊसमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्किट हाऊसमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री जितीन प्रसाद यांच्या समोरच मनमोहन सैनी आणि स्थानिक आमदार रितेश गुप्ता यांच्यात भांडण झाले. यांच्यातील भांडण इतकं विकोपाला गेलं की अखेर आमदाराच्या समर्थकांनी भाजपचे (BJP) मागासवर्गीय मोर्चाचे राज्य कार्यकारीणी सदस्य असलेल्या मनमोहन सैनी यांना बेदम मारहाण केली.
कशावरून झाला राडा ?
गुरुवारी रात्री बोलावण्यात आलेल्या या बैठकीत विकासाच्या मुद्द्यावरुन वादाला सुरुवात झाली. मनमोहन सैनी यांनी विकासाचा मुद्दा उपस्थित केला. आमदार असूनही स्थानिक भागाचा विकास होत नाही, असं म्हणत त्यांनी रितेश गुप्ता यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांनंतर रितेश गुप्ता यांना राग आला. संतापलेल्या रितेश गुप्ता यांनी, ‘तू माझं नाव कसं घेतलंस?’ असा जाब विचारला. त्यावरुन दोघांमध्येही जोरदार वाद सुरु झाला. यानंतर या वादाचे हाणामारीत रूपांतर झाले. या हाणामारीत आमदाराला किरकोळ जखम झाली आहे.
हे पण वाचा :
4 वर्षांच्या चिमुरड्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याने जमावाकडून नराधमाला बेदम मारहाण
बुलेट मिळाली : महाराष्ट्र केसरी “पृथ्वीराजला” छ. उदयनराजे भोसले यांच्याकडून प्रदान
कौतुकास्पद ! कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवची विम्बल्डन स्पर्धेसाठी आशियाई संघात निवड
kotak mahindra bank ने आपल्या बचत खाते आणि FD वरील व्याजदरात केली वाढ !!!