अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई
संपुर्ण भारत सध्या लाॅकडाऊन आहे. प्रखर ऊष्णता अंगाची लाही लाही करणारी ठरत आहे. घराबाहेर पडू नका असे शासनाचे आदेश सर्वत्र आहेत. मात्र अमरावती च्या मेळघाटात परीस्थिती वेगळीच आहे. करण येथे पाणीच नाही. होय ऐकून मन काहीस स्तब्ध झालय ना. मात्र हो आपण जे ऐकतोय ते खर आहे. मेळघाटातील भागामधील हे भीषण वास्तव आहे. महीला पूरूष मुली सगळेच पाण्यासाठी वन वन भटकत आहेत. काय आहेत त्यांच्या समस्या याचा आढावा घेतलाय आमचे प्रतीनीधी आशिष गवई यांनी बघूयात मेळघाटात पानी पेटले. .
महाराष्ट्रात लाकडाऊन असल्यामुळे, घराबाहेर पडू नका असे जरी सांगण्यात आलेलं असलं, तरी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात, आदिवासी पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करताहेत. चिखलदरा तालुक्यातील एकझिरा या गावामध्ये ही भीषन वास्तवीकता आहे. प्रशासनातर्फे गेल्या वर्षिपासून पाण्याचा टँकर ऊन्हाळ्याच्या दीवसांमधे येतात. मात्र कमी पाणी आणी ऊपभोक्ता जास्त असल्याने पाण्यासाठी झुंबळ उडते हे अतीषय धोकादायक वास्तव आहे. पण करणार तरी काय ? जर पाणी भरल नाही तर तहान कशी भागणार हाच यक्ष प्रश्न . त्यापुढे कोरोनाचे संकट मात्र या नागरीकांपूढे तोडके पडलेले दीसते. तर टँकरचे पाणी पुरत नसल्याने गावाबाहेर १ ते २ की. मीटर वर असलेल्या विहिरीवरून पाणी आता महीलांना आणावं लागत आहे.
त्यातही विहीरिमधील पाणी हे गढूळ झालेले असते. तेव्ह अशाच पाण्याचा वापर देखील येथील आदिवासी जनता करताहेत. त्यामूळे आता आधीच कोरोणाने जीवन जगणे कठीन केले आहे तर आता पाण्यासाठीची वन वन त्रस्त करत आहे. मेळघाट परिसरातील आदिवासींचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार का असा प्रश्न आता आदिवासीं बंधवांना सतावतोय हेच खर दूख्ख …