मुंबई प्रतिनिधी । आज मुंबईतील ग्रॅण्ड हयात या हॉटेलमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे एकूण १६२ आमदार एकत्रित येऊन तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसह एकजुटीची शपथ घेतली. ‘आम्ही १६२’ अशी ह्या कार्यक्रमाची टॅगलाईन होती. यामध्ये आपापल्या नेत्यांशी तसेच पक्षाशी एकनिष्ठेची शपथ जमलेल्या सर्व आमदारांनी घेतली.
सत्तासमीकरण जुळविन्यासाठी व भाजप विरोधात एकत्र येण्यासाठी राज्यातील या तिन्ही दलांनी ‘महाविकासआघाडी’ म्हणून नविन पर्याय तयार केला आहे. या आघाडीद्वारे राज्यात सत्ता स्थापणेसाठी जोरदार प्रयत्न असतांना दूसरीकडे भाजपने अजितदादा पवार यांच्या मदतीने शपथविधी आटोपुन सर्वांना धक्का दिला आहे. बहुमत स्थापन करण्यासाठी 30 नोव्हेंबर ही अंतिम तारीख असल्यामुळे वरील तिन्ही दलातील आमदार फुटू नये म्हणून आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जमलेल्या सर्व आमदारांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे व बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या इथे उपस्थित #162 नवनिर्वाचित आमदारांचं सर्वप्रथम निवडणुकीतील यशाबद्दल हार्दिक अभिनंदन. उद्याच्या पाच वर्षांसाठी महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करण्याचा संकल्प आपण केला आहे.#WeAre162 pic.twitter.com/mR37xdSZhr
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 25, 2019
फडणवीस सरकारचा शपथविधी हा लोकशाहीला काळीमा आहे. अल्पमतातील हे सरकार बहुमत सिद्ध करू शकत नाही, या सरकारने राजीनामा द्यावा.
कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व मित्रपक्षांचं संख्याबळ १६२ हून अधिक आहे, बहुमत महाविकास आघाडीकडे आहे: आ. @bb_thorat #WeAre162 pic.twitter.com/Y0I0g0MWOF— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 25, 2019
"एक मात्र बरं झालं की जो काही केविलवाणा प्रयत्न झाला हातपाय मारण्याचा, मी तर म्हणतो अजून करा कारण जेवढे तुम्ही प्रयत्न कराल आम्हाला अडविण्यासाठी, तेवढे आम्ही अधिक घट्टपणाने उभे राहू."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे pic.twitter.com/lorpl14h7l— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 25, 2019