एकनाथ शिंदेशी संपर्क झालाय; संजय राऊतांची मोठी माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे हेविवेट नेते एकनाथ शिंदे हे नाराज असून सोमवारी संध्याकाळी पासून ते नॉट रीचेबल आहेत. सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे असल्याचे सांगण्यात येत आहे. या एकूण घडामोडींमुळे राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेशी संपर्क झालाय अशी माहिती दिली आहे.

शिवसेनेचे काही आमदार मुंबईत नाहीत हे खरं आहे. काही ठिकाणी संशयास्पद वातावरण आहे पण मला वाटत नाही की एकनाथ शिंदे हे नाराज असतील. काल दिवसभर ते आमच्यासोबत होते. एकनाथ शिंदे यांच्या सोबत आमचा संपर्क झाला आहे अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मध्यप्रदेश, राजस्थान पॅटर्न वापरला जात आहे. पण त्यांचे हे षडयंत्र यशस्वी होणार नाहीत अस संजय राऊत यांनी म्हंटल. काहीही झाल तरी भाजपला महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

Leave a Comment