हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा असून राज्यात आम्ही आहोत म्हणूनच सत्ता आहे, असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे.तसेच हे सरकार मजबूत राहिले पाहिजे अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे असे अशोक चव्हाण यांनी म्हंटल.
स्थानिक पातळीवर जरी आम्ही वेगवेगळे निर्णय घेतले तरी हरकत नाही. मात्र, राज्य व्यवस्थित चालले पाहिजे, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. काँग्रेसच्या ताकदीनेच या महाविकास आघाडीचा विचारपूर्वक निर्णय आपण घेतला आहे. हे सरकार मजबूत राहिले पाहिजे हीच आमची प्रामाणिक भूमिका आहे,” असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजपाला देशातील, राज्यातील आरक्षण संपून टाकायचे आहे असा आरोप यावेळी अशोक चव्हाण यांनी केला आहे. “त्यामुळेच भाजपा असहकार्याची भूमिका दाखवत आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीतही केंद्र सरकारने योग्य भूमिका घेतली नाही.