हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच असून कोरोना परिस्थिती हाताळणे अवघड बनले आहे. त्यातच ऑक्सिजनची कमतरता असताना केंद्राकडून ऑक्सिजनचा पुरवठा करताना योग्य पद्दतीने नियोजन केलं जात नसल्याचा आरोप दिल्ली सरकारने केला होता. यावर आता मोदी सरकारने न्यायालयाला प्रत्युत्तर दिले आहे.
देशातील जनतेनं दोनदा आम्हाला निवडणून दिलं आहे. आम्हाला लोकांना होत असणाऱ्या त्रासाची जाणीव असून त्यांची काळजी आम्हालाही वाटते. त्यामुळेच आम्ही ऑक्सिजनचा पुरवठा पुरेश्या प्रमाणात करण्यासाठी राजकीय स्तरावर उच्च पातळीवर प्रयत्न सुरु असल्याचं मोदी सरकारने न्यायालयाला सांगितलं.
न्या. डी.व्हाय. चंद्रचूड आणि एम. आर. शाह यांच्या द्विसदस्यीय खंडपिठासमोर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारची बाजू मांडली. केंद्र सरकार केवळ दिल्लाचा विचार करत नसून संपूर्ण देशाचा विचार करत असल्याचं मेहता यांनी सांगितलं. हा विषय वाद घालण्याचा नसल्याचं सांगूनही दिल्ली सरकारने हा वाद केंद्र विरुद्ध दिल्ली सरकार असा करुन ठेवल्याचा आरोपही मेहता यांनी सरकारची बाजू मांडताना केला.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.