लॉकडाऊन लावायला आम्हालाही काही आवडत नाही पण तो लावावाच लागेल : अजित पवार

Ajit Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात सद्या दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिसस्थितीत “ राज्यात आम्हालाही लॉकडाऊन करायला फार आवडत वाटत नाही. परंतु इतके दिवस आपण सातत्याने सर्वांना सांगतोय की प्रत्येकाने काळजी घ्या. प्रत्येकाने नियमांचं पालन करा, कडक भूमिका घेण्याची वेळ येऊ देऊ नका. मागच्या वर्षी लोकांच्या मनात कोरोनाची भीती असल्याने नियमांचं तंतोतंत पालन झालं. मात्र आता तसं होताना दिसत नाही”,असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

राज्यात करोनाची स्थिती चिंताजनक होत चालल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली होती. या बैठकीत लॉकडाऊनबाबत गंभीरपणे विचार करण्यात आला व त्यानंतर एकमताने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पुण्यात ज्याप्रकारे निर्बंध लावण्यात आले आहेत. तोच फॉर्म्युला राज्यात वापरण्याबाबत विचार करण्यात आला. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण लावावेच लागले तर दोन दिवस आधी सांगितले जाईल, जेणेकरून कोणी अडकून राहणार नाही. पुण्यात ज्या पद्धतीने निर्बंध लागू करण्यात आले आहे तसेच निर्बंध सर्वत्र लागू करण्याची अनेकांची मागणी आहे. त्याबाबत उद्या सोमवारी 8 वाजता निर्णय होईल, ‘लॉकडाऊन कोणाला ही नको आहे, पण लोक ऐकत नसतील तर पर्याय नाही, वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार निर्णय घ्यावा लागणार आहे. ‘आताची लाट वेगळी आहे, घरात एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह होत आहे. ऑक्सिजन कमी पडू नये या साठी सरकारचा प्रयत्न आहे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.