हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना लस घेताच कोरोनाविरोधातील लढाईत आपण बाहुबली बनतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केलं आहे.संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना मोदींनी हे आवाहन केले.
कोरोनाची लस घेताच करोनाविरोधातील लढाईत आपण बाहुबली बनतो असं सांगत लस घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. मी आशा करत आहे की तुम्ही सगळ्यांनी लसीचा कमीत कमी एक डोस घेतला असेल. तरीही तुम्ही करोनाच्या प्रोटोकॉलचे पालन करा असे मोदी म्हणाले.
Vaccine is given in 'baahu' (arms), those who take it become 'Baahubali'. Over 40 cr people have become 'Baahubali' in the fight against COVID. It's being taken forward. The pandemic has gripped the entire world. So we want meaningful discussions in the Parliament over it: PM pic.twitter.com/YjrKUGQAqB
— ANI (@ANI) July 19, 2021
लस ही हातावर (बाहू) देण्यात येते आणि जेव्हा लस हातावर देण्यात येते तेव्हा तुम्ही बाहुबली बनता. करोनाविरुद्धच्या लढाईत जर तुम्हाला बाहुबली बनायचे असेल तर तुम्हाला हातावर लस घ्यावी लागेल. आता पर्यंत ४० कोटी पेक्षा जास्त लोकं करोनाविरुद्धच्या लढाईत बाहुबली बनले आहेत. पुढे ही हे काम जोरात सुरु राहिल,” असे मोदींनी म्हटलं.