आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, आपल्या हिताचे आहे तेच करणार; मुख्यमंत्र्यांची पूरग्रस्तांना ग्वाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेक ठिकाणी पूरस्थितीमुळे नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीत पाहणी केली तसेच नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना मदतीचे आश्वासन दिले.

अतिवृष्टीचा अंदाज मिळाल्यापासून प्रशासनाने काम सुरू केले. सांगलीच्या या भागात ४ लाख लोकांचे स्थलांतर केले.लोकांचे आर्थिक व शेतीचे नुकसान झाले आहे. जीवितहानी होऊ न देण्याला आमचे प्राधान्य आहे. या परिस्थितीवर तुमच्या सर्वांच्या साथीने मी मार्ग काढणारच असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटल.

यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल. कटू निर्णय घ्यावे लागतील. आपली त्याला तयारी हवी. कारण दरवर्षी पुराचे संकट येणार आणि आपण त्यातून उभे राहणार की परत पुढच्या वर्षी तेच करणार? दरवर्षी पाण्याच्या पातळ्या मोजण्यात आयुष्य घालवायचे नाही.

असं काही झाले की लगेच पॅकेज जाहीर केले जाते. मग त्यातला पैसा कुठे जातो ते कळत नाही. मला प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करायचे आहे. घर- दार, शेती यांचे किती नुकसान झाले याची आकडेवारी घेतली जात आहे.आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जे आपल्या हिताचे आहे तेच करणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्या सूचनांचा नक्की विचार करू.अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी केली.

Leave a Comment