टीम, HELLO महाराष्ट्र । ‘आमच्या पक्षाध्यक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास शिवसेना नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत राज्यसभेत वेगळी भूमिका घेईल’ असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज बुधवारी माध्यमांशी बोलताना केलं. ‘या विधेयकासंबंधी आमच्या मनात काही शंका आहेत, त्या दूर कारण्यासंदर्भांत समाधानकारक ऊत्तरे नाही मिळाल्यास आम्ही राज्यसभेत थेट लोकसभेत घेतलेल्या भूमिके विरुद्ध भूमिका घेऊ’ असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी माध्यमांसमोर दिले.
राऊत पुढे म्हणाले की, व्होट बँक राजकारणाला आमचा विरोध आहे. व्होट बँकेचे राजकारण होऊ नये, हे अयोग्य आहे. पुन्हा हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करु नका. या विधेयकात श्रीलंकेतील तामीळ हिंदुंसाठी काहीच नाही आहे. आम्हाला ज्या शंका आहेत त्या आम्ही संसदमध्ये मांडणार. जर आम्हाला उत्तर मिळाले नाही, तर आम्ही त्यांना विरोध करणार आहोत.
तेव्हा आधी संसदेत विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या शिवसेनेनं आपली भूमिका बदलली आहे. या विधेयकाचे समर्थन करणारी शिवसेना आता राज्यसभेत वेगळी भूमिका घेण्याची शक्यता असून, काँग्रेसच्या दबावापोटीच सेनेनं भूमिका बदल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.
Sanjay Raut, Shiv Sena MP on #CitizenshipAmendmentBill in Rajya Sabha: We have to clear our doubts on this bill, if we don’t get satisfactory answers then our stand could be different from what we took in Lok Sabha pic.twitter.com/OOfdwyR2xH
— ANI (@ANI) December 11, 2019