हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचे दृश्य पाहायला मिळत आहेत. अतिवृष्टी आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नागरीकांना घराच्या बाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यातच आता भारतीय हवामान खात्याने, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये येत्या 27 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागात अतिवृष्टीचे प्रमाण बघता मुंबई प्रादेशिक विभागाने अलर्ट जारी केले आहेत. या सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या २७ जुलै पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुख्य म्हणजे, जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला असताना नागरिकांनी सतर्क राहावे तसेच आवश्यक कामांसाठीच बाहेर पडावे असे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. दुसरीकडे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील २५ ते २७ जुलै पर्यंत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच याठिकाणी उद्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मित्रानो, तुमच्या गावात किंवा शहरात कधी पाऊस पडणार याची अचूक माहिती घ्यायची असेल तर आजच मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्हाला सलग ४ दिवसाचा अचूक हवामान अंदाज समजतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला १ रुपयाही खर्च करावा लागत नाही. याव्यतिरिक्त हॅलो कृषी मध्ये रोजचा बाजारभाव, जमीन मोजणी, सातबारा उतारा, पशूंची खरेदी विक्री, शेतीविषयक सल्ले यांसारख्या अनेक सुविधा अगदी मोफत मद्धे मिळत आहेत. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा आणि घरबसल्या सर्व सुविधांचा लाभ घ्या
२४ जुलैपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यामुळे अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्यापासूनच राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात होणार आहे. ही स्थिती पाहता नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पूरस्थिती निर्माण झाली तर तिथे तातडीने मदत पोहोचवण्यात यावी असे आव्हान देखील करण्यात आले आहे.
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. रायगड जिल्ह्यात तर सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पुरग्रस्त भागातील नागरिकांना अन्नधान्याची आणि १० हजारांची आर्थिक मदत करण्याची घोषणा सरकारने आज केली आहे. पूरग्रस्त भागातील स्थिती पूर्ववत होईपर्यंत सरकार नागरिकांना आवश्यक ती मदत पुरवणार आहे.