हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – राज्यात सध्या कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे लोकांना काहीच करता येत नाही आहे. सरकारने सगळ्या गोष्टींवर मर्यादा आणल्या आहेत. त्यामध्ये सरकारने लग्नकार्याला देखील ५० पेक्षा जास्त माणसे जमणार नाहीत याची काळजी घ्यायला सांगितली आहे. त्यामुळे अनेक लोकांनी मोजक्याच लोकांच्या उपस्तिथीमध्ये लग्नकार्ये पार पाडली आहेत. अशात एका फौजीची हटके लग्नपत्रिका सोशल मिडयात व्हायरल झाली आहे. लग्नाचं कोरडं आवताण देणार्या या लग्न पत्रिकेची सर्वत्र एकच चर्चा आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या आकाशचा नेहा गावडे यांच्याशी 6 जून रोजी विवाह झाला. मात्र कोर्टात लग्न करताना लग्नाचं कोरडं आमंत्रण दिल्यानं या जोडप्याच्या लग्नपत्रिकेची चर्चा रंगली आहे. लग्न कसं दाबात करायचं होतं. वरातीत घोडं नाचवून सार्या गावाला, पावण्या रावळ्यांना, मित्र परिवाराला पंगतीत मोक्कार जेवू घालून ढेकर द्यायला लावायची हूती. पण ह्यो कोरोना पाहुणा काय जायचं नावंच घेईना, तवा रजिस्टर पद्धतीने लग्न करत असल्याचं सांगत त्यांनी कोरोना संपल्यानंतर घराच्या दारात जेवणाचा बेट आखणार असल्याचं सांगून पैपाहुण्यांना नाराज होऊ दिलेलं नाही.
तसेच कोणी रागात जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे. घरातील मागे राहिलेले लग्न जोरात केले जाईल तेव्हा काळजी नसावी असंही तळटीप देत पत्रिकेत म्हटलं आहे. हि पत्रिका वाचली तर तुम्हालाही ती खूप आवडेल. खाली आम्ही त्या पत्रिकेची प्रत देत आहे.