शाब्बास रे पट्ट्या, फेसबुकने दिलं 22 लाखांचे बक्षीस : बार्शीच्या मयूर फरताडेने शोधून काढल्या इन्स्टाग्राममधील त्रुटी

0
32
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर | आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात फेसबुक व इन्स्ट्राग्राम यांचा वापर मोठ्या प्रमाणात लोकांकडून केला जातोय. या फेसबुक व इंट्राग्राम वापरणाऱ्यांची प्रायव्हसी सध्या धोक्यात येणार होती. ती वाचावीत चक्क फेसबुक व इन्स्ट्राग्राममधील चूक शोधून काढण्याचं काम सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील मयूर फरताडे या युवकाने केलं आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल फेसबुक व इन्स्ट्राग्रामकडून त्याला चक्क 22 लाखांचे बक्षीसही देण्यात आलं.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या गावातील मयूर फरताडे असे या युवकांचे नाव आहे. तो सध्या कोल्हापूर येथील तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संगणक शास्त्राचे शिक्षण घेत आहे. या युवकाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा एक बाग शोधून काढला. त्या बागबाबतची माहिती मयूरने हॅकर्सच्या हातात येण्यापूर्वी फेसबुक व इंट्राग्रामला दिली. त्याच्या माहितीची दखल घेत फेसबुकने त्याला 22 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसा मेलही फेसबूकने मयूरला पाठविला आहे.

मयूर फरताडे याने शोधून काढलेला बग हा एखाद्या युजरला इन्स्टाग्रामवर टार्गेटेड मीडिया दाखवू शकत होता. मीडिया आयडीची मदत घेऊन कोणत्याही युजरचे खाजगी आणि अर्काइव्ह केलेल्या पोस्ट, स्टोरी, रील आणि IGTV व्हिडिओही बघता येत होते. यासाठी त्या युजरला फाॅलो करणे गरजेचे नव्हते. फेसबुक व इन्स्टाग्रामलासुद्धा त्याच्या दोषांची माहिती नव्हती. मयूरने फेसबुकच्या बग बॉउंटी प्रोग्रॅमच्या माध्यमातून या त्रुटीची माहिती 16 एप्रिलला दिली होती. कंपनीने 15 जूनपर्यंत ही चूक सुधारली. आणि माहिती दिलेल्या मयूरला फेसबूकने 22 लाखांचे बक्षीसही दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here