Gold Investment : जोखीम असूनही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याछा सल्ला तज्ज्ञ का देतात??? जाणून घ्या

Sovereign Gold Bond
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Investment :  सोने हे लोकांच्या गुंतवणुकीच्या लोकप्रिय साधनांपैकी एक आहे. भारतात सोन्याकडे दागिने आणि मालमत्ता म्हणून पाहिले जाते. आधी सोने फक्त फिजिकल स्वरूपातच विकले जात होते मात्र आता गोल्ड एक्सचेंज-ट्रेड फंड, सरकारद्वारे जारी केलेले सॉव्हरेन ट्रेड बॉन्ड आणि गोल्ड म्यूचुअल फंड्स आहेत.

मात्र इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड, इक्विटी किंवा मालमत्ता प्रमाणेच सोन्यामध्येही गुंतवणुकीचा धोका आहे. चला तर मग आज सोन्याच्या गुंतवणुकीशी संबंधित जोखमींबद्दल जाणून घेउयात …

How Can I Invest in Gold?

फिजिकल गोल्ड

जेव्हा आपण सोन्याचे दागिने, कॉईन किंवा बार खरेदी करतो तेव्हा किंमतीमध्ये GST द्यावी लागते. याशिवाय कोणत्याही मौल्यवान वस्तू विशेषतः सोने चोरीला जाण्याची शक्यता जास्त आहे. तसेच त्याची शुद्धता आणि साठवण समस्यांबाबतही शंका आहेत.

गोल्ड म्युच्युअल फंड

तज्ज्ञांच्या मते, गोल्ड म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे हा अतिशय जोखमीचे असते. यामागील कारण असे की, गोल्ड म्युच्युअल फंड रिअल टाइम सोन्याच्या किंमतीवर आधारित असतात. ज्यावर बाजारातील अस्थिरतेचा परिणाम होतो. त्यामुळे याद्वारे फायदा होईल की नुकसान हे कळणे अवघड असते. Gold Investment

Investing in Gold: Advantages and Disadvantages! - Business Partner Magazine

सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड

इथे हे लक्षात घ्या सोन्यामध्ये गुंतवणूक करताना भांडवली नुकसान होण्याचा धोका असतो कारण सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड हे थेट आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किंमतीशी जोडले गेलेले असतात. तसेच गुंतवणूकदाराने बाँड विकत घेतलेल्या किंमती बॉण्डवर रिडीम केलेल्या किंमतीपेक्षा जास्त असल्यास, त्याला नुकसान होऊ शकते. Gold Investment

गोल्ड एक्स्चेंज

गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स हे फिजिकल सोन्यापेक्षा महाग असू शकतात. कारण या अतिरिक्त व्यवस्थापन शुल्कासोबत इतरही अनेक धोके आहेत. हे फक्त रोख स्वरूपात रिडीम केले जाऊ शकतात सोन्यामध्ये नाही. हे सोन्याचे काँट्रॅक्टस आणि डेरिव्हेटिव्ह आहेत.

How to Invest in Gold - and Make Money

तज्ज्ञ गुंतवणूकिचा सल्ला देतात

मात्र लक्षात घ्या कि, अनेक धोके असूनही तज्ञांकडून सोने खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो. यामागील पहिले कारण असे कि, सोने ही एक मौल्यवान संपत्ती आहे. या व्यतिरिक्त सोने महागाईच्या काळामध्ये साथ देते. तसेच आर्थिक अनिश्चिततेच्या काळात आर्थिक आधार देऊ शकते. Gold Investment

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/scripts/NotificationUser.aspx?Id=12340&Mode=0

हे पण वाचा :

आपले हरवलेले Credit Card कसे ब्लॉक करावे ते समजून घ्या

Indian Bank कडून कर्ज घेणे महागणार, MCLR 0.15 टक्क्यांनी वाढला !!!

ICICI Bank कडून कर्ज घेणे महागले, बँकेने MCLR मध्ये केली 20 बेसिस पॉईंटची वाढ

Business Idea : कागदापासून ‘या’ वस्तू तयार करून मिळवा भरपूर पैसे !!!

James Anderson ने घरच्या मैदानावर भारताविरुद्ध पूर्ण केले बळींचे शतक !!!