हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सारा अली खानचा चित्रपट ‘लव आज काल 2‘ 14 फेब्रुवारी रोजी म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डे’ला रिलीज होणार आहे. सारा अली खान सध्या कार्तिक आर्यन याच्यासह चित्रपटाच प्रमोशन करत आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.इतकेच नाही तर सारा अली खानही या काळात कवी बनली आहे आणि बर्याचदा तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर ती मार्मिक शैलीत बोलते.असेच काहीसे तिने आपल्या ताज्या पोस्टमध्येही केले आहे. सारा अली खानच्या ताज्या फोटोत तिच्या पाठीमागे मिठाई दिसत असून यासह तिने चोले-भटुरेचा उल्लेखही केला आहे.
सारा अली खानने दिल्लीची मिठाई बद्दल लिहिले कि,’जब जोई ने देखी मिठाई, चारों ओर खुशी छाई, दिल्ली की अब उसे बहुत याद आई, छोले भठूरे तैयार रखो भाई…’ सारा अली खान ‘लव्ह आज कल’ च्या प्रमोशनसाठी आता दिल्लीला जात आहे, आणि हे तिने आपल्या पोस्ट आणि काव्याद्वारे सूचित केले आहे.असं असलं तरी सारा अली खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती चॉकलेट खाताना दिसली आहे. या व्हिडिओमध्ये सारा अली खानला खाण्याची किती आवड आहे हे स्पष्ट दिसत आहे.
सारा अली खानचा पुढचा चित्रपट ‘कुली नंबर 1’ आहे जो कार्तिक आर्यनसोबत ‘लव आज काल’ मध्ये दिसल्यानंतर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तीच्या सोबत वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यानंतर सारा अली खान आनंद एल रायच्या ‘अतरंगी रे’ चित्रपटात दिसणार आहे, या चित्रपटात अक्षय कुमार आणि दक्षिणचा सुपरस्टार धनुष तीच्यासोबत दिसणार आहेत. आता तर ती कविता देखील करत आहे, अशी अपेक्षा आहे की लवकरच ती एका चित्रपटासाठी एक गाणे देखील लिहिेल.