काय सांगताय काय ! माजी खासदार आनंद परांजपे तब्बल दीड तास ताटकळत उभे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बातमीचं टायटल वाचून जरा वेगळं वाटलं ना ! स्वाभाविकच आहे. ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार आनंद परांजपे यांना चक्क दीड तास ताटकळत उभे राहत, संगित खुर्ची सारखा खेळ खेळत कार्यक्रम पूर्ण करण्याची वेळ आली.

तर झालं असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज अंबरनाथ शहरात कार्यकर्ता मेळावा पार पडला.या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, प्रमोद हिंदुराव,महेश तपासे आदी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.या कार्यक्रमाला ठाणे जिल्हा समन्वयक म्हणून आनंद परांजपे यांची देखील उपस्थिती होती.पण नियोजनाच्या अभावामुळे म्हणा किंवा जागेच्या कमतरतेमुळे म्हणा.स्टेजवर पहिल्या रांगेत मर्यादितच खुर्च्या ठेवल्या होत्या. परांजपे यांना यायला थोडा उशीर झाला.त्या आधीच खुर्च्यांवर सगळे मान्यवर स्थानापन्न झाले होते.जिल्हा समन्वयक असल्यामुळे परांजपे यांनी मागे बसणं उचित नव्हतं. परिणामी पहिल्या रांगेतील जो मान्यवर बोलायला उठेल त्याच्या जागी जाऊन परांजपे यांना बसावे लागत होते.यावरून एकंदरीत दिड तास परांजपे संगीत खुर्ची सारखा खेळ खेळत होते.

दरम्यान, आनंद परांजपे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे आणि पालघर जिल्हा समन्वयक आहेत. शिवसेनेच्या तिकीटावर ते कल्याण मतदारसंघातून लोकसभा खासदार राहिले आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.परंतु सलग दोन वेळा त्यांना शिवसेनेच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. परांजपे हे व्यवसायाने इंजिनियर आहेत.त्यांच्या वडिलांनी म्हणजेच प्रकाश परांजपे यांनी देखील शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभेत ठाण्याचं प्रतिनिधित्व केलं आहे.सध्या ते ठाणे आणि पालघर जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment