Saturday, January 28, 2023

असं काय घडलं की, पत्नीची हत्या करून पतीने स्वतःही केली आत्महत्या

- Advertisement -

नांदेड | पत्नीच्या डोक्यात डोक्यात जड वस्तूने वार करून तिची हत्या केली.  आणि त्यानंतर स्वतः झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नायगाव तालुक्यातील नरंगल येथे शुक्रवारी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान उघडकीस आली. कौटुंबिक वादातून ही घटना घडली.

नरंगल येथील शेतकरी असलेले मुकिंदा भुजंगराव पट्टेकर (वय 55) यांना दारूचे व्यसन होते. शेतातील कामावरून पत्नीसोबत ते वाद घालत होते. मुकिंदा पट्टेकर यांच्या शेतात आखाडा असून या ठिकाणी जनावरे आहेत. रेणुकाबाई मुकिंदा पट्टेकर (50) या सकाळी सहा वाजताच्या दरम्यान दूध काढून आणण्यासाठी आखाड्याकडे गेल्या त्याच वेळी मुकिंदा यांनी पत्निपाठोपाठ जाऊन तिच्या डोक्यात जड वस्तूने वार करून खून केला.

- Advertisement -

त्यानंतर मुकिंदा याने स्वतःच्या शेतापासून एक किलोमीटर अंतरावर जाऊन दोरीने झाडला गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती नायगाव पोलिसांना कळताच पोलिस निरीक्षक पडवळ यांनी सहकार्यासोबत घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह नायगावाच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन करुन दोन्ही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. मृतांचा मुलगा शिवाजी मुकिंदा पट्टेकर (वय 25) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक पडवळ यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.