गाड्यांवरील BH सिरीज म्हणजे काय? कोणाला मिळते ही नंबर प्लेट?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्तापर्यंत तुम्ही गाड्यांवर वेगेवेगळ्या प्रकारचे नंबर बघितले असतील. राज्यांच्या नावानुसार वेगवेगळी नंबर प्लेट सिरीज असते. उदाहणार्थ महाराष्ट्रातील गाडी असेल तर MH सिरीजचा नंबर असतो, कर्नाटकमधील वाहन असेल तर KA किंवा गुजरातमधील कोणती गाडी असेल तर GJ या सिरीजची नंबर प्लेट तुम्ही बघितली असेल. परंतु काही गाड्यांवर कोणत्याही राज्याचा कोड नसून BH असा कोड सुद्धा पाहिला असेल. मग हा BH कोड नेमका कोणासाठी असतो? कोणत्या नागरिकांना ही BH सिरींजची नंबर प्लेट मिळते ? अशा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तुमच्या प्रश्नाची उत्तरे आज आम्ही सोडवतो.

Hyundai Creta 2024 : खूपच डॅशिंग दिसतेय नवीन Creta गाडी; किंमत अन् लाँच कधी होणार पहा..

BH नंबर प्लेटला भारत प्लेट म्हणतात. भारताच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 28 ऑगस्ट 2021 रोजी भारत (BH ) सिरीज नंबर प्लेट लाँच केली. BH सिरीज नंबर प्लेट संपूर्ण भारतात चालते. जे लोक नोकरीच्या निमित्ताने किंवा काही कामाच्या निमित्ताने सतत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करत असतात अशा लोकांसाठी BH सिरीज नंबर प्लेट फायदेशीर आहे. कारण BH नंबर प्लेटमुळे वाहनाची पुन्हा पुन्हा रजिस्ट्रेशन ट्रांसफर करण्याची गरज भासणार नाही तसेच यामुळे लोकांचा वेळ आणि खर्चही वाचतो.

iPhone 15 Pro : लवकरच बाजारात येणार Apple चा नवीन फोन; फिचर्स अन् किंमत काय?

BH सिरीज नंबर प्लेट कोणाला मिळते-

जे लोक संरक्षण क्षेत्रात काम करतात म्हणजे कोणत्या सैन्यात किंवा निमलष्करात त्यांना BH सिरीज नंबर प्लेट मिळू शकते. तसेच जे राज्य किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत त्यांनाही ही नंबर प्लेट मिळते. याशिवाय जे कर्मचारी खाजगी कंपन्यांमध्ये काम करतात ते सुद्धा आपल्या गाड्यांवर BH सिरीज नंबर प्लेट लावू शकतात, मात्र त्यासाठी त्यांच्या कंपनीचे प्लांट कमीत कमी देशातील 4 राज्यात किंवा किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये तरी असावे लागतात. BH सिरीज नंबर प्लेट साठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमची कागदपत्रे परिवहन अधिकाऱ्याकडून व्हेरिफाय करून घ्यावी लागतील. त्यानंतर वाहन मालकाला MoRTH च्या वाहन पोर्टलवर लॉग इन करून तुम्हाला APPLY करावं लागेल.

Yamaha RX 100 : फक्त 60 हजार रुपयांना इथे मिळतेय बेस्ट बाईक; आजच करा बूक..

Force Citiline : आता संपूर्ण कुटुंबासोबत करा प्रवास; लाँच झाली भलीमोठी कार

Fan Speed : पंख्याचा वेग कमी झालाय ? अशा प्रकारे फक्त 70 रुपये खर्च करून मिळवा थंड हवा