Hyundai Creta 2024 : खूपच डॅशिंग दिसतेय नवीन Creta गाडी; किंमत अन् लाँच कधी होणार पहा..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Hyundai Creta 2024 : कोरोना काळानंतर भारतीय ऑटो सेक्टरने जोरदार भरारी घेतली आहे. आता तर बऱ्याच कंपन्यांकडून नवनवीन गाड्या लाँच केल्या जात आहेत. यामध्ये Hyundai ही कार बनवणारी कंपनी देखील मागे नाही. या कंपनीची Hyundai Creta ही गाडी मध्यम आकाराच्या SUV मधील अव्वल विक्रेता ठरली आहे.

Hyundai Creta facelift India launch deferred to 2024 | Team-BHP

आपली हीच प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी आता कंपनीकडूनही जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यामुळे कंपनीकडून Creta ला नवीन अवतारात लाँच केले जाणार असल्याचे सांगितले गेले आहे. 2023 ऑटो एक्सपोमध्येच Hyundai हे मॉडेल लॉन्च करणार होते. अलीकडेच, कंपनीने या नवीन मॉडेलचा व्हिडिओ देखील इंटरनेटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ही गाडी कशी असेल याची माहिती कळते. Hyundai Creta 2024

New Hyundai Creta launch in India in 2024

यामध्ये नवीन क्रेटामध्ये स्टायलिश पॅरामेट्रिक ग्रिल देण्यात आले आहे. तसेच कंपनीने या ग्रिलमध्येच डीआरएल इंटीग्रेट केले आहे. जे फक्त गाडी ऑन झाल्यावरच दिसून येतील. यासोबतच सर्व नवीन एलईडी हेडलॅम्प आणि समोरील बाजूस सिल्व्हर स्किड देखील दिले गेले आहेत. मात्र, यामध्ये फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला नाही. Hyundai Creta 2024

7 Hyundai Cars At 2023 Auto Expo - New Creta, Ioniq 5, Ioniq 6, Nexo

तसेच डायमंड-कट अलॉय व्हील ड्युअल-टोनमध्ये देण्यात आले आहे. यानंतर, त्याच्या मागील बाजूस कनेक्टेड टेललॅम्प स्ट्रिप उपलब्ध असेल. या कारचे इंटेरिअर आधीच्या क्रेटासारखेच आहे. ज्याची चावी आणि इन्फोटेनमेंट सिस्टीम एकसारखेच असेल. याशिवाय, या नवीन क्रेटाच्या इंटेरिअरमध्ये पूर्णपणे डिजिटल असलेले इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळेल. एकूणच काय कि, ही कार सर्व बाबींमध्ये याच्या आधीच्या मॉडेलसारखीच आहे. मात्र ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ती भारतीय बाजारपेठेत लॉन्च होण्याची वाट पाहावी लागेल. Hyundai Creta 2024

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hyundai.com/in/en

हे पण वाचा :
iPhone 15 Pro : लवकरच बाजारात येणार Apple चा नवीन फोन; फिचर्स अन् किंमत काय?
Fan Speed : पंख्याचा वेग कमी झालाय ? अशा प्रकारे फक्त 70 रुपये खर्च करून मिळवा थंड हवा
CIBIL Score चांगला ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स
उष्णतेमुळे वैतागला आहात ? ‘हा’ Cooler अवघ्या काही मिनिटांतच घर करेल थंड
ATM मधून पैसे काढण्याआधी Cancel बटण दाबणे आवश्यक आहे का??? RBI म्हणते कि…