हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या संपूर्ण शरीरात मेंदू हा अतिशय महत्त्वाचा पार्ट असतो. मेंदूला काही झालं तर माणसाचे जगणेच नष्ट होते, त्यामुळे मेंदू निरोगी असं महत्त्वाचे असते. अलीकडच्या धावपळीच्या जीवनात ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण वाढलेले आहे. मानसिक तणाव, हाय बीपी आणि इतर कारणांमुळे मेंदूला धक्का बसून रक्तपुरवठा खंडित होतो. यालाच ब्रेन स्ट्रोक म्हणतात. दरवर्षी देशात सुमारे 18 लाख लोकांना ‘ब्रेन स्ट्रोक’ होतो.
जेव्हा आपल्या मेंदूत एखाद्या भागाचा रक्तपुरवठा खंडित होतो किंवा कमी होतो तेव्हा मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये मिळण्यापासून रोखले जाते तेव्हा स्ट्रोक होतो. कधीकधी रक्तवाहिन्या फुटल्यामुळे मेंदूमध्ये रक्त गळते. हे रक्त मेंदूपर्यंत जेव्हा पोहोचू शकत नाही किंवा पोहोचत नाही अशा वेळी मेंदू काम करणे थांबवतो.
ब्रेन स्ट्रोकची काय असू शकतात कारणे-
मानसिक तणाव
धावपळीची जीवनशैली
धूम्रपान
मद्यपान
उच्च रक्तदाब,
मधुमेह
लठ्ठपणा
काय आहेत लक्षणे-
चालताना अडखळणे अथवा शरीराचे संतुलन बिघडणे
दोन्ही डोळ्यांनी पाहण्यात अडचण येते
अशक्तपणा
लकवा येण
डोकं दुखणे
झटके येणे
हृदयविकार