हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणत्याही बँकेतून कर्ज घेत असताना तुमचा सिबिल स्कोर (CIBIL Score) महत्त्वाची भूमिका बजावतो. सिबिल स्कोरचा फुल्ल फॉर्म क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड असा आहे. CIBIL स्कोर म्हणजे तुमच्या क्रेडिटची सर्व हिस्टरी दाखवतो . तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज मिळताना कोणती अडचण येत नाही, परंतु जर तुमचा सिबिल स्कोर खराब असेल तर मात्र कर्ज काढताना तुमच्यापुढे अडचणी निर्माण होऊ शकतात. सिबिल स्कोर चांगला ठेवण्यासाठी तुमचा पेमेंट इतिहास, क्रेडिट युटिलायझेशन रेशो, क्रेडिट मिक्स, क्रेडिट ऍप्लिकेशन आणि क्रेडिट रिपोर्ट या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. यामधील क्रेडिट युटिलायझेशन रेशो म्हणजे काय आणि त्याचा आपल्या Cibil Score वर कसा परिणाम होतो? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
Credit Utilisation Ratio म्हणजे काय?
क्रेडिट युटिलायझेशन रेशो म्हणजे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे लिमिट किती आहे आणि तुम्ही त्याचा वापर किती करता याचा रेशो… . उदाहरणार्थ, जर तुमचे क्रेडिट कार्ड लिमिट हे 50,000 रुपये असेल आणि तुम्ही महिन्याला त्या क्रेडिट कार्डवरील 25,000 रुपयांचा वापर केला तर त्याचा अर्थ तुमचा क्रेडिट रेशो हा
50% असेल. क्रेडिट मर्यादा संपल्यानंतर, क्रेडिट युटिलायझेशन रेशो वाढतो, साधारणपणे क्रेडिट युटिलायझेशन रेशो 30 टक्केच्या वर गेला तर त्याचा तुमच्या सिबिल स्कोर वर निगेटिव्ह परिणाम होतो.
Cibil Score वर कसा परिणाम होतो ?
आता, तुम्ही विचार करत असाल की, क्रेडिट युटिलायझेशनचा तुमच्या सिबिल स्कोअरवर कसा परिणाम होतो? तर आम्ही तुम्हाला सांगतो, क्रेडिट युटिलायझेशन हेच दाखवत की तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या क्रेडिटपैकी नेमका किती वापर करता.. जर तुम्ही क्रेडिट कार्ड लिमिटचा जास्तीत जास्त वापर करत असाल तर हे स्पष्ट होते कि तुम्ही कर्जावर खूप जास्त अवलंबून आहात आणि आर्थिक अडचणीत आहात. त्यामुळे याचा तुमच्या सिबिल वर वाईट प्रभाव पडतो. तर दुसरीकडे क्रेडिट वापर कमी असेल तर हे स्पष्ट होते कि तुम्ही तुमच्या क्रेडिटबाबत खूप जबाबदार आहात आणि यामुळे तुमचा CIBIL स्कोर वाढण्यास मदत होते .