Salary Slip म्हणजे काय ??? त्यामध्ये कोण-कोणत्या बाबींचा समावेश असतो हे समजून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Salary Slip च्या मदतीने कोणत्याही व्यक्तीचा खरा पगार किती आहे याचा अंदाज येतो. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरी बदलताना सॅलरी स्लिप महत्वाची ठरते. तसेच जेव्हा आपण पहिल्यांदा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करतो तेव्हा देखील सदर बँकेकडून सॅलरी स्लिपची मागणी केली जाते. जी पहिल्यानंतरच आपल्यासाठी क्रेडिट कार्डचे लिमिट तयार केले जाते. अशा परिस्थितीत, Salary Slip म्हणजे काय याची माहिती आपल्याकडे असली पाहिजे. हे लक्षात घ्या कि, सॅलरी स्लिप काही भागात विभागली जाते. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…

Why You Should Pay Employees a Competitive Salary | Matchr

बेसिक सॅलरी

आपल्या Salary Slip तील हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, जो एकूण पगाराच्या 35 ते 50 टक्के असतो. पगाराच्या या भागावर कर्मचाऱ्याला सर्व फायदे उपलब्ध होतात. हे लक्षात घ्या कि, टॅक्सच्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण भाग करपात्र असेल.

घरभाडे भत्ता

घराचे भाडे भरण्यासाठी मिळणाऱ्या भत्त्याला घरभाडे भत्ता असे म्हंटले जाते. आपल्या स्‍थानिक निवासावर अवलंबून, बेसिक सॅलरीच्या 40 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत घरभाडे भत्ता दिला जातो.

वाहतूक भत्ता

आपल्याला प्रवासासाठी कंपनीकडून भत्ता दिला जातो. यामध्ये जास्तीत जास्त 1600 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम, जी आपल्या Salary Slip नुसार दिली जाईल. हे लक्षात घ्या की ते टॅक्सच्या कक्षेत येत नाही.

Where And How Do You Invest Your Monthly Salary? | IIFL Finance

रजा प्रवास भत्ता (LTA)

आपल्या नियोक्त्याकडून कर्मचार्‍यांना सुट्ट्यांमध्ये हा भत्ता देखील दिला जातो, ज्यामध्ये आपल्या कुटुंबाचा प्रवास खर्चाचाही समावेश असतो. मात्र कर सवलत मिळवण्यासाठी सर्व प्रवास खर्चाच्या पावत्या आवश्यक असतील. तसेच, प्रवासाच्या खर्चाव्यतिरिक्त, इतर कोणत्याही प्रकारच्या खर्चाचा समावेश LTA मध्ये केला जाणार नाही. हे लक्षात घ्या कि, 4 आर्थिक वर्षांमध्ये फक्त 2 ट्रिप टॅक्स फ्री असतील.

वैद्यकीय भत्ता

आपल्या नियोक्त्याकडून कर्मचार्‍यांना सर्व्हिसदरम्यान झालेला वैद्यकीय खर्चही भत्त्याच्या रूपात दिला जातो. हे पेमेंट बिलाच्या बदल्यात मिळते, त्यासाठी आपल्याला वैद्यकीय खर्चाची पावती द्यावी लागेल. टॅक्सच्या दृष्टिकोनातून, 15,000 रुपयांपर्यंतच्या वार्षिक वैद्यकीय बिलांवर कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही.

परफॉर्मन्स बोनस आणि विशेष भत्ता

कर्मचाऱ्याच्या प्रोत्साहनासाठी नियोक्त्याकडून हा भत्ता दिला जातो. त्याच्या रकमेपैकी 100% करपात्र असेल. याशिवाय, पगारामध्ये इतरही काही भत्त्यांचा समावेश आहे, जे पूर्णपणे करपात्र असतील.

6 Tips To Negotiate Your Salary With Confidence—And Get What You're Worth

पगारातून कापले जाणारे काही भाग

1. भविष्य निर्वाह निधी (PF)- दर महिन्याला भविष्य निर्वाह निधीच्या बेसिक सॅलरीच्या 12 टक्के रक्कम आपल्या पगारातून कापली जाईल. तसेच, तेवढीच रक्कम नियोक्त्याकडून आपल्या पीएफ खात्यात जमा केली जाईल. मात्र कपातीचा दर कंपनीच्या नियमांनुसारच ठरवला जाईल. Salary Slip

2. व्यावसायिक कर- हा फक्त कर्नाटक, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, आसाम, छत्तीसगड, केरळ, मेघालय, ओडिशा, त्रिपुरा, झारखंड, बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये व्हॅलिड आहे. यामध्ये पगारातील काही भाग आपल्या टॅक्स स्लॅबनुसार कापला जाईल.

3. स्रोतावर कर वजा- इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नियमांनुसार, नियोक्त्याकडून आपल्या एकूण टॅक्स स्लॅबमधून वजा होणारी रक्कम ठरवली जाते आणि ती आपल्या पगारातून टीडीएसच्या रूपात कापली जाते. ही TDS कपात टाळण्यासाठी, आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला नियोक्त्याला वार्षिक बचतीचा अंदाज सादर करा आणि टॅक्स वाचवण्यासाठी कलम 80C अंतर्गत गुंतवणूक करा. Salary Slip

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.nsiindia.gov.in/InternalPage.aspx?Id_Pk=55

हे पण वाचा :

चांगला Password तयार करण्यासाठी वापरा ‘या’ खास टिप्स !!!

Nora Fatehi ने सुकेश चंद्रशेखरशी संपर्क तोडला होता, मात्र जॅकलीन गिफ्ट्स घेत राहिली

UPI-नेट बँकिंगद्वारे डिजिटल पेमेंट करताना लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी

IPL 2023 साठी मुंबई इंडियन्सकडून Mark Boucher ची मुख्य प्रशिक्षकपदी निवड

Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी मिळेल Disney + Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन