हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हल्लीच्या धावपळीच्या जगात शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम गरजेचाच आहे. त्यासाठी सूर्यनमस्कार हा एक परिपूर्ण व्यायाम आहे. सूर्यनमस्कार ही १२ महत्त्वपूर्ण आसनांची मालिका आहे. सूर्यनमस्कार म्हणजे सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी. पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा दाता हा सूर्यच. सूर्यनमस्कार हा एक १२ आसनांचा ठरलेला चक्राकार क्रम आहे. हा योगाभ्यास शरीर, मन व श्वासाला एकत्र आणतो. ध्यानात जाण्याची ती पहिली पायरी आहे.
सूर्य नमस्कार योगाने दिवसाची सुरूवात केली तर शरीरासाठी आणि मनासाठी हे चांगले ठरते . या सूर्य नमस्कार योगची प्रक्रिया साधारण 12 आसनांमध्ये पूर्ण होते आणि प्रत्येक पायरीवर एक वेगळं आसन यामध्ये करावं लागतं. या 12 योगासनांच्या क्रियेला सूर्य नमस्कार असे म्हणतात. आज आपण जाऊन घेऊयात सूर्यनमस्काराचे आरोग्यदायी फायदे…
सूर्यनमस्काराचे आरोग्यदायी फायदे…
सूर्यनमस्कार ऊर्जादायी, ध्यानदायी व आरामदायी असतात. ते शरीराला लवचिक बनवतात व त्यांमुळे रक्ताभिसरण सुधारते
सूर्यनमस्कार केल्याने शरीरातील महत्वाच्या अवयवांचे कार्य सुधारते. आपल्या अस्थिसंस्था व पचनसंस्था सुधारतात. त्याबरोबरच वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांचे संतुलन साधले जाते.
सूर्यनमस्कारामुळे आपले हृदय स्वास्थ्य आणि श्वसनासंबंधी विकार दूर होतात. तसंच यामुळे वजन कमी होते. वजन कमी करण्यासाठी सूर्य नमस्काराचे फायदा होतो असं म्हंटल जाते.
सूर्यनमस्काराने चिंता आणि मनःस्थितीत बदल कमी होतो. एक शांत प्रभाव आपल्याला एकाग्र बनवतो आणि आपल्याला स्पष्ट विचार करण्यास अनुमती देते.
सूर्य नमस्काराच्या योगमुळे ध्यानधारणाही होते आणि त्यामुळे मन एकाग्र करण्यास शक्ती मिळते. त्यामुळे तणावापासून मुक्ती देण्यास याचा फायदा मिळतो.
सूर्य नमस्कार केल्याने आतड्यांचीही क्रियाशीलता वाढते आणि शरीर प्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते. आतड्याच्या कार्यक्षमतेसाठी याचा चांगला परिणाम होतो आणि त्यामुळे शरीरातील रक्तपुरवठा चांगला होतो आणि अनेक आजारांपासून दूर राहतो.