हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 9 ते 10 सप्टेंबर रोजी राजधानी दिल्लीमध्ये जी 20 परिषद पार पडत आहे. यंदाच्या परिषदेत अध्यक्ष पदाचा मान भारताला देण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मोठी प्रतिमा निर्माण करण्यासाठी ही योग्य संधी असल्याचे म्हटले जात आहे. या परिषदेसाठी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था राबविण्यात आली आहे. तर 50 हजारपेक्षा जास्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या जी 20 परिषदेत 19 देशातील अनेक राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख, त्यांच्या सरकारचे प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे पदाधिकारी तसेच संयुक्त राष्ट्रसंघ, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि जागतिक व्यापार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
जी 20 नेमक म्हणजे काय?
यावर्षी दिल्लीमध्ये जी 20 ची 18 वी परिषद बैठक होणार आहे. जी 20 म्हणेजच ग्रुप ऑफ ट्वेन्टी होय. 1999 झाली या राष्ट्रगटाची स्थापना करण्यात आली आहे. संपूर्ण जगातील प्रमुख विकसित आणि विकसनशील देशांचा राष्ट्रगट म्हणजे जी 20 परिषद होय. या गटात 19 देश आणि युरोपियन संघाचा सहभाग आहे. या परिषदेमध्ये युरोपीय परिषदेचे अध्यक्ष व युरोपीय मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष युरोपियन परिषदेचे प्रतिनिधित्व करतात. थोडक्यात, जी 20 जगातील २० प्रमुख देशांच्या अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांचा एक सामूहिक गट असतो. भारतासह जी 20 मध्ये अनेक प्रमुख देशांचा समावेश आहे. जी 20 परिषदेचा प्रमुख हेतू हा असतो की, एखाद्या जागतिक आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रमुख देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत.
जी 20 मध्ये कोणत्या देशांचा समावेश
जी 20 गटात भारतासह अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रांस, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका अशा प्रमुख 19 देशांचा समावेश आहे. तर युरोपियन युनियन संघटना या राष्ट्रगटातला विसावा सदस्य आहे. या परिषदेमध्ये संयुक्त राष्ट्रे, जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड बँक अशा आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख आणि काही इतर देशांचे पाहुणे उपस्थित राहणार राहतात.
भारतात होणाऱ्या जी 20 परिषदेसाठी कोण येणार?
यावर्षी होणाऱ्या परिषदेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथोनी अल्बनीज, जर्मन चांसलर, फ्रांसचे राष्ट्रपति इमैनुएल मैक्रों, दक्षिण अफ्रीका, तुर्की आणि अर्जेंटीनाचे राष्ट्रपतीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, इंग्लंडचे पंतप्रधान ऋषि सुनक, जपानचे पंतप्रधान फिमियो किशिदो हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत. यासोबतच स्पेनचे पंतप्रधान, बांगलादेशाचे पंतप्रधान, मॉरिशसचे पंतप्रधान, सिंगापूर नेदरलँड चे पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. तसेच इतर देशांचे प्रमुख देखील जी 20 ला उपस्थित असतील.