हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Investment : गेल्या एका महिन्यात बहुतेक विकसित देशांच्या बॉन्ड यील्ड्सशी जोडलेल्या पोर्टफोलिओला मोठा धक्का बसला आहे. बहुतेक उदयोन्मुख बाजारपेठांमधील बॉण्ड्सच्या किंमतीही घसरत आहेत. सध्या जागतिक चलन बाजारात प्रचंड अस्थिरता आहे. डॉलरचू किंमत गेल्या दोन दशकांच्या सर्वोच्च पातळीवर आहे. दुसरीकडे, जपानचे येन, युरो आणि पाउंड गेल्या दशकांच्या नीचांकी पातळीवर गेले आहेत. तसेच बँकांचे व्याजदरही गगनाला भिडले आहेत. कमोडिटी मार्केटचा डिमांड आउटलुकही कमकुवत राहिला आहे. Gold Investment
अशा परिस्थितीत सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का??? असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. यामुळे सोन्यामधील गुंतवणुकीसाठी काय धोरण असावे ??? याबाबत इक्वल इंडिया फाऊंडेशनचे संचालक विजय कुमार गाबा यांनी मनीकंट्रोलशी बोलताना सांगितले की,” भू-राजकीय अस्थिरता, महागाई आणि सध्याच्या युद्धाजन्य परिस्थितीमुळे सोन्या-चांदी मध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित होते. मात्र, सध्याच्या ताज्या संकटात या मौल्यवान धातूंनी आपला सुरक्षितपणा गमावला आहे.” Gold Investment
10 टक्क्यांनी सोने झाले स्वस्त
गाबा यांनी पुढे सांगितले की,” सध्या महागाईचा दर हा गेल्या चार दशकांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. रशिया-युक्रेन युद्ध, चीनी समुद्रातील तणाव, तसेच मोठ्या प्रमाणावर चलनाची छपाई यामुळे जानेवारी 2021 पासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत 10 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्याच बरोबर कमी मागणी, डिजिटल चलनामुळे निर्माण झालेली आव्हाने, उच्च सुरक्षा जोखिम आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ या घटकांचा सोन्याच्या किंमतींवर परिणाम होतो आहे.” Gold Investment
गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का ???
गाबा पुढे म्हणाले की,” काही महिन्यांपूर्वी त्यांनी सोन्याचे आकर्षण कमी होण्याची भीती व्यक्त केली होती. आता अलीकडच्या ट्रेंडमुळे ही भीती आणखी गडद झाली आहे.” “असे म्हणता येईल की, महामारीनंतर उदयास आलेल्या जागतिक बाजारपेठेत सोने हा प्रमुख घटक असू शकणार नाही. त्यानंतर पुढील 12 महिने सोन्यामध्ये गुंतवणुकीच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात,” असेही त्यांनी सांगितले. हे लक्षात घ्या कि, सोन्यामध्ये 10 टक्के घसरण होत असेल तर त्यामध्ये गुंतवणूक करता येईल. Gold Investment
सोन्याची आजची किंमत जाणून घ्या
गेले काही दिवस सतत घसरण झाल्यानंतर आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव आज सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये सोने 0.20 टक्क्यांनी घसरले. त्याच वेळी, चांदीचा दर देखील कालच्या बंद किंमतीच्या तुलनेत 0.64 टक्क्यांनी खाली आला आहे. Gold Investment
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/investments-deposits/govt-schemes/gold-banking/sovereign-gold-bond-scheme-sgb
हे पण वाचा :
Multibagger Stocks : ‘या’ 3 केमिकल कंपन्यांच्या शेअर्सनी दिला 800% रिटर्न !!!
Post Office च्या ‘या’ बचत योजनेत मिळेल FD पेक्षा जास्त रिटर्न !!!
Gold Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या स्पॉट किंमतीत जोरदार वाढ, आजचे दर पहा
Share Market पैसे गुंतवत असाल तर टॅक्सशी संबंधित ‘हे’ नियम जाणून घ्या
‘या’ फार्मा कंपनीच्या Multibagger Stock ने गेल्या 23 वर्षांत दिला कोट्यवधींचा नफा