Wednesday, October 5, 2022

Buy now

जे खैरेंना 20 वर्षांत जमले नाही, ते दोन वर्षांत केले; कराडांचे खैरेंना प्रत्युत्तर

औरंगाबाद – शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना वीस वर्षात जे जमले नाही ते मी दोन वर्षात करून दाखवले आहे. त्यामुळे दिल्ली कुणाला लवकर समजली हे त्यांच्या पेक्षा नागरिकांना समजले आहे, असे प्रत्युत्तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी काल दिले.

खैरे आणि डॉ. कराड यांच्यात रविवारी आरोप-प्रत्यारोप झाले होते. शेंद्रा येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना डॉ. कराड यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, वीस वर्षात खैरेंना दिल्ली समजली नाही. मला जर दोन वर्षात काम करता येत असेल तर त्यांनी वीस वर्षात काय केले, यावेळी खासदार सुजय विखे यांची उपस्थिती होती.

मातोश्री समोर हनुमान चालीसा वाचणे वरून आमदार रवी राणा खासदार नवनीत राणा सध्या कोठडीत आहेत. यावर खासदार विखे म्हणाले राज्यात सध्या भारनियमन सुरू आहे. दूध दराचा प्रश्न आहे. यावर कोणी बोलत नाही. सर्व पक्षांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलले पाहिजे. राणा दांपत्याच्या हनुमान चालीसा पठाणाने शेतकऱ्यांच्या जीवनात काही फरक पडणार नाही, असा टोलाही खासदार विखे यांनी लगावला.