व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कोणी ओठाखाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल तर….; राऊतांनी उडवली सोमय्यांची खिल्ली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत सोमय्यांची खिल्ली उडवली. कोणी एखादा माथेफिरू ओठाखाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे अस राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपवर चौफेर टीका केली. विरोधकांवर हल्ले झाले म्हणजे काय झालं आहे? असा सवाल करत कोणी एखादा माथेफिरू ओठाखाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करत असेल तर त्याच्या मूर्खपणा कडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे,’ असं म्हणत राऊतांनी सोमय्यां वर टीका केली.

यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर देखील निशाणा साधला. फडणवीसांनी मुंबई हायकोर्टाने भोंग्या बाबतचा दिलेला आदेश वाचला पाहिजे. हनुमान चालिसा म्हटली म्हणून कोणावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही. पण त्यांचेही मन अशांत असल्याने त्यांनी घरात जाऊन हनुमान चालिसा वाचली पाहिजे. दुसऱ्याच्या घरात घुसून परिस्थिती बिघडवणार असाल तर गुन्हा दाखल होणार,” असे संजय राऊतांनी सांगितले.