हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक लोकांना कामाचे व्याप किंवा इतर अनेक गोष्टींमुळे झोपेचा त्रास होण्यास सुरुवात होते. काही वेळेला त्यांची झोप पूर्ण न झाल्याने चिडचिड होते. पण जर आपल्या झोपेच्या समस्या दूर होण्यासाठी योग आणि योगासने करणे गरजेचे असते. झोपेमुळे आरोग्य व्यवस्थित राहण्यास बरीच मदत होते. जर आपले आरोग्य जर सुंदर आणि निरोगी ठेवायचे असल्यास तुम्ही दररोज सकाळी व्यायाम करावा , व्यायाम केल्याने अनेक रोगाच्या समस्या कमी होतात. योग करा म्हणजे आजार होणार नाही. आजार गंभीर नसला तरी ही योग प्रभावी असू शकतो. रात्री झोप न आल्याने कोणते व्यायाम केले जावेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात …
—- झोप न येण्याची कारणं
शरीराला थकवा न जाणवणं आणि काळजी किंवा सतत दिवसं रात्र विचार करणं. प्रत्येक वयातील लोकांना आपल्या जीवनात वेगवेगळ्या समस्या आणि कामाचा व्याप याना सामोरे जावे लागते. त्यामुळे सुद्धा झोप येत नाही. त्यावेळेस कोणत्या प्रकारचे व्यायाम करावेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात …
—– प्राणायाम
रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर कमीत कमी ५ ते १० मिनिटे प्राणायाम करावा. आपण योगनिद्रेचा सराव देखील करू शकता. या साठी आपण शवासनात झोपून आपण शरीराला आणि मन आणि मेंदूला सैल सोडा. डोक्यापासून पायापर्यंत आपल्या संपूर्ण शरीराला सैल सोडा. पूर्ण श्वास घेऊन सोडायचा आहे. आता असा विचार करा की आपले हात, पाय, पोट, मान, डोळे सर्व काही सैल झाले आहेत. आता स्वतःला सांगा की मी योगनिद्रेचा सराव करत आहे. आपल्या मनाला शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे हलवा आणि त्यांना सैल आणि तणावरहित असण्याची सूचना द्या. आपल्या मनाला उजव्या पायाच्या अंगठ्यावर घेऊन जा. पायाची सर्व बोटं किमान तळपाय, टाच, पोटऱ्या, गुडघा, मांडी, नितंब, कंबर, खांदा सैलसर होतं आहे. अश्या प्रकारे डावा पाय देखील सैल सोडा. श्वास घ्या आणि सोडा.
—- सूर्यनमस्कार
जर शरीर योग्य पद्धतीने थकित असेल तर त्यावेळेस योग्य प्रकारे झोप येते. शरीराला थकविण्यासाठी आपण झोपण्यापूर्वी कमीत कमी १ तास व्यायाम करा किंवा फक्त २० मिनिटासाठी सूर्य नमस्कार करा. सूर्यनमस्कार घालण्याच्या पद्धती जाणून घेऊन शास्त्रीय पद्धती नुसारच सूर्यनमस्कार घालावेत.
रात्रीच्या वेळेत जर झोप येत नसेल किंवा झोप पूर्ण होत नसेल तर आपल्या दररोज च्या कार्यकाळात थोडासा बद्धल करणे गरजेचे राहते.
— दक्षिण दिशेला पाय करून झोपू नका.
— रात्री हलकेच जेवण करावं.
— दिवसात किंवा दुपारी झोपण्याची सवय सोडून द्या.
— कोणत्याही प्रकारचे नशा घेउन किंवा औषधे घेऊ नका.
— झोपण्याच्या पूर्वी आपली काळजी आणि विचारांना लांब करून झोपा.
— रात्री उशिरापर्यंत जागणं आणि सकाळी उशिरा उठणं सोडा.
— झोपेची वेळ टाळल्याने झोप कमी होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’