मुख्यमंत्री शिंदे अपात्र ठरले तर पुढे काय होणार? जाणून घ्या ‘या’ 5 शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षांवर आज सर्वोच्च न्यायालय निकाल जाहीर करणार आहे. निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार कि एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागणार? 16 आमदार अपात्र होणार कि नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलं आहे. 16 आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. त्यामुळे जर कोर्टाने हे सर्व आमदार अपात्र केलं तर पुढे काय होणार असा प्रश्न निर्माण होतोय. चला आज आम्ही तुम्हांला 5 शक्यता सांगतो.

1) सर्वोच्य न्यायालयाने 16 आमदारांना अपात्र ठरवल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना तातडीने राजीनामा द्यावा लागेल. आणि नव्याने सरकार स्थापन करण्याचे सोपस्कार पार करावे लागेल.

2) आमदारकी गेली तरी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात आणि पुढील 6 महिन्यात पुन्हा आमदार बनू शकतात. किंवा काहींच्या मते पुढील 6 वर्ष त्यांना निवडणूक लढवता येणार नाही.

3) आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे गेले तर पुढील निवडणुकीपर्यंत सद्यस्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

4) सत्तासंघर्षाचे हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवले जाईल

5) निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर ठाकरे गट पुनर्विचार याचिका दाखल करून कोर्टात पुन्हा दाद मागू शकते