2 राज्यांच्या विषयांमध्ये केंद्र काय करणार? सीमावादावर भाजपने हात झटकले?

modi shah
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाचा मुद्दा जोरदार गाजला. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका मांडली. दोन्ही राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मात्र 2 राज्यांच्या विषयांमध्ये केंद्र काय करणार असं अजब उत्तर दिले.

सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र्र कर्नाटक सीमावादावर आक्रमक भूमिका मांडल्यानंतर ओम बिर्ला म्हणाले, तुम्ही काहीही बोलला तरी तुमचं कोणतेही वक्तव्य रेकॉर्ड होणार नाही. हा संवेदनशील विषय आहे. हे संसद आहे आणि हा विषय 2 राज्यांमधील आहे, यामध्ये केंद्र सरकार काय करणार असं विधान ओम बिर्ला यांनी केले. ओम बिर्ला यांच्या विधानाने भाजपने महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर हात तर झटकले नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या –

गेल्या 10 दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र रचले जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बेताल वक्तव्यं करत आहेत. कर्नाटक सीमेवर महाराष्ट्रातील लोकांना मारहाण केली जात आहे, गाड्यांची तोडफोड केली जात आहे हे चालणार नाही. कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात भाजपचे सरकार आहे त्यामुळे अमित शहांनी याप्रकरणी लक्ष्य घालावे आणि आपली भूमिका स्पष्ट करावी असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.