क्या बात है! रस्त्यावरच्या कुत्र्याला बनवलं सेल्समन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा आपण रस्त्यावरील कुत्र्यांना पाहतो. पण त्यांच्याकडे पहिले कि, किळस येते. अनेक कुत्री हि वयाने कमी असली तरी मरकुंडी झालेली असतात. रस्त्यावरची कुत्री आहेत म्हणून कोणी त्यांना खायला सुद्धा देत नाही. सगळे त्यांचा तिरस्कार करतात. साधारण रस्त्यावर असणाऱ्या कुत्र्यांना जीवन नसत. आज आहे तर उद्या नाही अशी अवस्था असते. तर अनेक कुत्र्यांचा जीव जातो . तर अनेक कुत्र्यांना लोक मारतात. पण या सगळ्यावर मात करत एका कुत्र्याच नशीब उगडल आहे. हुंदाई कंपनीने त्याला सेल्समन चा दर्जा दिला आहे.

 

काही दिवसांपूर्वी एक कुत्रा शोरूम च्या बाहेर फिरत होता. त्याला काहींना काहींना खायला मिळत होत त्यामुळे बऱ्याच दिवसापासून तो कुत्रा तेथेच घुटमळत होता. काही कर्मचाऱ्यांशी त्याची ओळख झाली होती. त्याचा शांत स्वभाव बघून त्या कुत्र्याला शोरूम मध्ये घेतले गेले. बाहेर फिरणाऱ्या कुत्र्याला हुंदाई कंपनीने आत मध्ये घेऊन त्याला मान दिला आहे. जो बाहेर फिरणारा कुत्रा आता सेल्समन चे काम करणार आहे. हुंदाई हि जागतिक दर्जाची कर बनवणारी नामंकित कंपनी आहे. या कंपनीने टॅक्सन नावाच्या कुत्र्याला शोरूम मध्ये काम दिले तर आहेच. तर त्याच्या नावाचे आय कार्ड हि बनवले आहे. हि घटना ब्राझील मधील आहे. त्यामुळे हुंदाई कंपनीचे विशेष कौतुक केले जात आहे. कि एका सध्या कुत्र्याला इतका चांगला दर्जा दिला. त्यामुळे शहरभर याच गोष्टींचे चर्चा सुरू होती.

ब्राझील मधील हुंदाई कंपनीने त्याचे फोटो शेअर केले आहेत. त्यात असे लिहले आहे कि, हुंदाई प्राइम डिलरशिप मध्ये सेल्स डॉग टॅक्सन ला भेटा. या नव्या सदस्याचे वय १ वर्ष आहे. हुंदाई कंपनी आणि परिवार याचे स्वागत करत आहे. शोरूम च्या आतच त्याचे घर आणि केबिन आहे. तो इतर लोकांसारखे काम करण्याचा प्रयत्न करत आहे. टॅक्सन हा कुत्रा इतका छान मिसळला आहे कि, तो मिटिंग मध्ये पण सामील होतो. त्यामुळे टॅक्सन हा चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment