WhatsApp ने आणले नवीन फिचर आता चुकून डिलीट केलेले मेसेज करू शकता UNDO!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – WhatsApp हे आता आपल्या जीवनातील अविभाज्य भाग बनले आहे. याचा वापर जगभरातील लाखो लोक करत असतात. आपल्या यूजर्ससाठी कंपनी दररोज नवनवीन अपडेट देत असते. कंपनीने आता आणखी एक नवीन फीचर आणले आहे, ज्याच्या माध्यमातून चुकून डिलीट केलेले मेसेज UNDO करून परत मिळवू शकता. WhatsApp ने नवीन ‘Accidental delete ‘फीचर लॉन्च केले आहे.

कसे काम करते हे फिचर ?
जेव्हा तुम्ही चुकीच्या व्यक्ती किंवा ग्रुपला मेसेज पाठवता आणि चुकून ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ ऐवजी ‘डिलीट फॉर मी’ वर क्लिक करता. ही समस्या सोडवण्यासाठी कंपनीने अ‍ॅक्सिडेंटल डिलीट फीचर आणले आहे. हे फीचर यूजर्सना चुकून डिलीट झालेल्या मेसेजला पाच सेकंदांची विंडो देऊन आणि ‘Delete for Me’ वरून ‘Delete for everyone’ वर क्लिक करून मदत करेल.

आता मेसेज UNDO करता येणार
हे फीचर यूजर्सना डिलीट झालेला मेसेज UNDO करण्यासाठी काही सेकंद देते. मिळालेल्या माहितीनुसार, हे फीचर Android आणि iPhone डिव्हाइसवरील सर्व यूजर्ससाठी उपलब्ध आहे.

‘मेसेज युवर सेल्फ’ फीचर लॉन्च
गेल्या महिन्यात, मेसेजिंग प्लॅटफॉर्मने भारतात एक नवीन ‘मेसेज युवर सेल्फ’ फीचर लॉन्च करण्याची घोषणा केली. हे फीचर तुम्हाला नोट्स, रिमांइडर आणि अपडेट पाठवण्यासाठी तुमचा स्वतःचा नंबर मेसेज करण्याची सुविधा देणार आहे. या फीचर्समुळे युजर्स व्हॉट्सअ‍ॅपवर त्यांची टू-डू लिस्ट मॅनेज करण्यासाठी नोट्स, रिमाइंडर्स, शॉपिंग लिस्टसारखे मेसेज देखील पाठवू शकतात.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या