हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp कडून आपल्या युझर्ससाठी अनेक नवनवीन फीचर्स लाँच केले जातात. आताही WhatsApp ने युझर्ससाठी स्क्रीनशॉट ब्लॉकिंग नावाचे फीचर आणले आहे. आपल्या युझर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊनच हे फिचर लाँच करण्यात आल्याचे सांगण्यात येते आहे. गेले काही दिवस या फिचरबाबत चर्चा केली जात होती. गेल्या अनेक दिवसांपासून कंपनीकडून याची चाचणी केली जात होती. मात्र आता हे फीचर रोल आउट करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या फक्त काही बीटा टेस्टर्ससाठीच हे फिचर उपलब्ध करण्यात आले आहे. या फीचरच्या मदतीने युझर्सना View Once म्हणून पाठवलेले व्हिडिओ तसेच फोटोंचे स्क्रीनशॉट घेता येणार नाहीत.
WABetainfo च्या या वेबसाईटवरील रिपोर्टनुसार, WhatsApp कडून फक्त काही बीटा टेस्टर्ससाठी स्क्रीनशॉट ब्लॉकिंग फीचर रोल आउट करण्यास सुरुवात झाली आहे. या रिपोर्ट्सनुसार, WhatsApp कडून View Once फोटो आणि व्हिडिओची नवीन व्हर्जन रिलीज केले जाणार आहे.
कोणत्याही युझर्सला स्क्रीनशॉट आणि स्क्रीन रेकॉर्डिंग करण्यापासून रोखणे तसेच प्रायव्हसी सुधारणे हा त्यामागील उद्देश आहे. मात्र सध्या, हे फिचर फक्त काही बीटा युझर्ससाठीच उपलब्ध असेल. यासाठी युझर्सना गुगल प्ले स्टोअरवरून WhatsApp चे नवीन बीटा व्हर्जन डाउनलोड करावे लागेल.
स्क्रीनशॉट ब्लॉकिंग फिचर कसे काम करेल ???
जर एखाद्या युझरकडून View Once म्हणून फोटो किंवा व्हिडिओ पाठवला गेला तर ज्या युझरने स्क्रीनशॉट घेतला असेल त्याला एक एरर दिसेल, ज्यामध्ये ‘Can’t Take Screenshot Due to Security Policy’ असे लिहिलेले असेल. इतकेच नाही तर जर एखाद्याने थर्ड पार्टी ऍपवरून स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला संपूर्ण ब्लॅक स्क्रीन दिसेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.whatsapp.com/
हे पण वाचा :
IDFC First Bank च्या शेअर्सने एका दिवसात घेतली 10 टक्क्यांनी उसळी
Business : घरबसल्या ‘या’ 5 मार्गांनी दरमहा करता येईल हजारोंची कमाई !!!
Bank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले FD वरील व्याजदर, नवीन दर तपासा
FD Rates : कोणत्या बँकेकडून FD वर किती व्याज मिळत आहे ते पहा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे ताजे दर तपासा