हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हॉट्स अॅप येत्या काळात आपल्या युझर्ससाठी सतत काही नवीन्यपूर्ण फीचर्स घेऊन येत आहे. या शानदार मेसेजिंग अॅपसाठी कंपनी आता एका नवीन फीचरवर काम करत आहे.हे इन्स्टंट मेसेजिंग अॅप आता अॅनिमेटेड स्टिकर फिचरवर काम करत असल्याची चर्चा बर्याच दिवसां पासून होते आहे, परंतु हे फिचर कधीपासून लागू केले जाईल याबद्दल कोणतीही माहिती अदयाप सोमर आलेली नाही. 2019 पासून स्टिकर्ससाठी व्हॉट्स अॅपमध्ये सपोर्ट आलेला आहे, मात्र सध्या त्याच्या अॅनिमेटेड स्टिकर्सची टेस्टिंग चालू आहे. ज्यासह युझर्स अधिक मजेदार पद्धतीने चॅटिंग करतील.
लवकरच नवीन अॅनिमेटेड स्टिकर्स जोडली जातील
व्हॉट्सअॅपने गेल्या अनेक वर्षांमध्ये बरेच फीचर्स समाविष्ट केलेली आहेत आणि यातील बहुतेक फीचर्स इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणून या अॅपचा वापर वाढविण्यासाठी आहेत. या नवीन अॅनिमेटेड स्टिकर्स सपोर्ट विषयीची माहिती WABetaInfo या वेबसाइटद्वारे दिली गेली आहे जी एक वेबसाईट आहे आणि अॅप्लिकेशन्सच्या बीटा व्हर्जन वरील नवीन अपडेटचा मागोवा घेते.
अहवालात असे म्हटले आहे की WhatsApp v2.20.194.7 बीटा व्हर्जन अँड्रॉइडचे आहे, तर आयफोनची WhatsApp v2.20.70.26 बीटा व्हर्जन आहे. आपल्याकडे देखील हेबीटा व्हर्जन असल्यास आपण या नवीन अॅनिमेटेड स्टिकर्सची टेस्टिंग देखील घेऊ शकता.
आपण या पद्धतीने वापरू शकता
अॅनिमेटेड स्टिकर्स व्हॉट्सअॅप स्टोअर वरून डाउनलोड करता येतात. हे तीन प्रकारे वापरले जाऊ शकते. जर युझर्सकडे नवीन अपडेटेड व्हर्जन असेल तर ते हे स्टिकर पाहू शकतात, ज्याद्वारे ते हे अॅनिमेटेड स्टिकर्स पाठवू आणि फॉरवर्ड करू शकतात. दुसरे म्हणजे, युझर्स थर्ड पार्टीकडूनही हे स्टिकर्स घेऊ शकतात ज्यांचे स्वतःचे अॅनिमेटेड स्टिकर्स पॅक आहेत आणि थर्ड पार्टी युझर्स व्हॉट्सअॅप स्टोअरमधून डीफॉल्ट अॅनिमेटेड स्टिकर पॅकहवी डाउनलोड करू शकतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.