हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Wheat and Floor Prices : सध्या गहू आणि पिठाच्या किरकोळ किंमतींमध्ये वाढ झाली आहे आणि या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार कडून लवकरच पावले देखील उचलली जाणार आहे, असे अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी नुकतेच सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की,” सरकार गहू आणि पिठाच्या किंमतींवर सातत्याने लक्ष ठेऊन आहे. तसेच या किंमती कमी करण्यासाठी बरेच पर्याय शोधले जात आहेत”. मात्र, मंत्रालयाकडून नेमक्या काय उपाययोजना केल्या जात आहेत हे संजीव चोप्रा यांनी स्पष्ट केले नाही. यावेळी भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) गोदामांमध्ये गहू आणि तांदळाचा पुरेसा साठा असल्याचे सचिवांनी यावेळी सांगितले.
खुल्या बाजारात गहू विकण्याची कल्पना
देशांतर्गत उत्पादनांमध्ये किरकोळ घट झाल्यामुळे आणि केंद्रीय पूलसाठी FCI खरेदीतील कमतरता यामुळे किंमती नियंत्रित करण्यासाठी केंद्राने मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ज्यामुळे आता सरकार गहू खुल्या बाजारात विकणार का, असे विचारले असता ते म्हणाले की, सर्व पर्यायांचा शोध सुरू आहे. Wheat and Floor Prices
गव्हाच्या उत्पादनात घट
खुल्या बाजारातील टंचाईची पूर्तता करण्यासाठी पीठ गिरणी मालकांनीही सरकारकडे FCI च्या गोदामातून गव्हाचा साठा काढून टाकण्याची मागणी केली आहे. हे जाणून घ्या कि, 2021-22 (जुलै-जून) या पीक वर्षात भारतातील गव्हाचे उत्पादन 106.84 लाख टन इतके कमी झाले आहे, जे मागील वर्षी 109.59 लाख टन इतके होते. यंदाच्या खरेदीतही मोठी घसरण 19 लाख टन झाली. चालू रब्बी (हिवाळी पेरणी) हंगामात गव्हाचे पिकाखालील क्षेत्र जास्त आहे. आता नवीन गहू पिकाची खरेदी एप्रिल 2023 पासून सुरू होईल. Wheat and Floor Prices
OMSS धोरणाबाबत सरकारचा दृष्टिकोन
सध्याच्या वाढत्या किरकोळ किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ओपन मार्केट सेल स्कीम (OMSS) अंतर्गत पीठ गिरण्यांसारख्या मोठ्या ग्राहकांना FCI स्टॉकमधून पुढील वर्षी 1.5-2 लाख टन गहू सोडण्याचा सरकार विचार करत असल्याचे सूत्रांकडून गेल्याच महिन्यात सांगण्यात आले होते. या OMSS धोरणांतर्गत, सरकारकडून भारतीय अन्न महामंडळ (FCI) या सरकारी उपक्रमाला अन्नधान्य, खुल्या बाजारात पूर्व-निर्धारित किंमतींवर मोठ्या प्रमाणात ग्राहक आणि खाजगी व्यापाऱ्यांना वेळोवेळी विकण्याची परवानगी देते. यामागील उद्देश हा गरजेच्या वेळेला पुरवठा वाढवणे आणि सामान्य खुल्या बाजारातील किंमती कमी करणे हा आहे. Wheat and Floor Prices
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://fci.gov.in/
हे पण वाचा :
118 वर्षे जुन्या City Union Bank कडून FD वरील व्याजदरात वाढ, पहा नवीन व्याजदर
‘या’ Tax Saving Scheme मध्ये गुंतवणूक करून मिळवा कर सवलत !!!
विमानातील लघवीप्रकरणी Air India ला 30 लाखांचा दंड, DGCA ची मोठी कारवाई
Ration Card : मोफत रेशन घेणाऱ्या करोडो लोकांसमोर उभे नवीन संकट, जाणून घ्या त्याविषयीची माहिती
Kisan Credit Card म्हणजे काय ??? याद्वारे अशा प्रकारे मिळवा स्वस्त दरात कर्ज !!!