ठाणे । नवी मुंबईत अभ्यासावरून झालेल्या भांडणानंतर 15 वर्षीय मुलीने आपल्या आईचा कराटे बेल्टने गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नंतर मुलीने याला अपघाती मृत्यू म्हणण्याचा प्रयत्न केला. ही घटना 30 जुलै रोजी नवी मुंबईतील ऐरोली परिसरात घडली. रबाळे पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की,”मुलगी आणि तिची आई (40) यांच्यात सतत भांडणे होत होती कारण महिलेला तिच्या मुलीने वैद्यकीय अभ्यासक्रम घ्यावा अशी ईचछा होती पण मुलीने असे करण्यास नकार दिला होता.
मुलीने तिच्या आईबद्दल गेल्याच महिन्यात पोलिसांकडे तक्रार देखील केली होती आणि त्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांनाही समजावले होते. 30 जुलै रोजी मुलीने पोलिसांना कळवले की, तिच्या आईचा पडल्यामुळे मृत्यू झाला आहे.
ते म्हणाले की,” मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि तपास रिपोर्टमध्ये महिलेचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. चौकशीदरम्यान मुलीने कबूल केले की, आईशी झालेल्या भांडणानंतर तिने कराटे बेल्टने आईचा गळा दाबला होता. यानंतर मुलीला सोमवारी ताब्यात घेण्यात आले आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.