हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शेतकऱ्यांचा विचार करून केंद्र सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना आखली आहे. मात्र गेले तीन महिने होऊन देखील अद्याप या योजनेचा जीआर ही निघालेला नाही. सध्या राज्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात या योजनेसाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तरी देखील ही योजना फक्त कागदोपत्रीच राहिली असल्याचे चित्र आहे.
शेतकरी महासन्मान निधी योजना नेमकी कधीपासून राबवणार व ती कशी राबवणार याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. किंवा या योजनेचा जीआर देखील राज्य सरकारकडून काढण्यात आलेला नाही. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर २००० रुपयांप्रमाणे तीन हप्त्यांत पैसे द्यायचे की ३००० रुपयांचे दोन हप्त्यांत पैसे याबाबत सरकार अजून स्पष्ट नाही. या निर्णयामुळे ही योजना मध्येच अडकून राहिली आहे.
मुख्य म्हणजे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी, आधार लिंक, भूमिलेख अभिलेख नोंदी करणे अनिवार्य आहे. परंतु राज्यात शेतकऱ्यांची आधार जोडणी आणि केवायसी नसल्यामुळे ३१ लाख ८३ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित राहायची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने देखील या गोष्टीकडे लक्ष दिलेले दिसत नाही.
शेतकरी मित्रानो, तुम्हालाही सरकारच्या कोणत्याही योजनेसाठी अर्ज करून आर्थिक लाभ घ्यायचा असेल तर आजच मोबाईल मध्ये Hello Krushi अँप डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून कोणत्याही शेतीशी संबंधित योजनेसाठी थेट अर्ज करता येतोय. यासाठी तुम्हाला १ रुपया सुद्धा खर्च करावा लागत नाही हे विशेष. याव्यतिरिक्त हॅलो कृषी मध्ये सातबारा उतारा, जमीन मोजणी, हवामान अंदाज, रोजचा बाजारभाव यांसारख्या अनेक सुविधा अगदी फुकट मध्ये मिळत आहेत. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा.
राज्यातील १८ लाख ९६ हजार शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. तर १२ लाख ८६ हजार ६८७ शेतकऱ्यांचे खाते आधारकार्डशी जोडलेले नाही. यामुळेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी १ कोटी १६ लाख ८८ हजार पैकी ९८ लाख शेतकरी अपात्र ठरले आहेत. याबाबतची माहिती अंमलबजावणी प्रमुख सुनील चव्हाण यांनी दिली आहे.